पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत नैवेद्य शबर अर्पण करुनी करी पूर्ण ती पूजा ॥ शवर शबरि मग हस्त जोडुनी स्तविती त्या गिरिराजा ॥ जय शंकर ताता ॥ आमी शरणचि तुज आतां ॥ ७ ॥ पद. (शारदे दास कामदे,) या चालीवर. हरहरा ॥ शंभुशंकरा ॥ पार्वतीवरा ॥ भवचक्रचालका ॥ पतित मी, तारि तारि मज मदनांतका ॥ १ ॥ शिवशिवा ॥ भवानी धवा ॥ जन्म चूकवा ॥ ब्रह्मांडनायका ॥ शरण शरण तुलारे मी भवहारका ॥२॥ करि त्वरा ॥ सकळ सुरवरा ॥ जान्हवीधरा ॥ लीन तुझे पायी ।। दया करुनि बा निजपदीं मज नेई ॥ ३ ॥ दिंडी. पुजा करुनी जो शबर स्त्रीस पाही ॥ मेनिका की कोण ही उभी राही ॥ असे पाहुनि जाहला हर्ष त्याला ॥ मागुती तो शिवरूप शबर झाला ॥ १ ॥ वरुन येई ते यान त्यास न्याया ॥ झालि दोघांची तरी दिव्य काया ॥ शिवपदाला मिरवीत त्यास नेती ॥ ईशमहिमा ते मुखी सर्व गाती ॥ २ ॥ कामदा. ( या चालीवर. ) पाहुनी असें सिंहकेत तो ॥ काय हो मनी राव बोलतो ॥ भक्त तो खरा शबर जाहला ॥ शंकरें तया पादच ठेविला ॥ १ ॥ - अंजनीगीत. विनोद करुनी तया कळविलें ॥ चिताभस्म की मुख्यचि धरिलें ॥ शबरासहि ते खरे वाटलें ॥ आणी भस्म नित्यची ॥ १ ॥ धन्य ह्मणावी शबरी कामिनी ॥ भस्मा साठी देह जाळुनी ॥ प्रसन्न केला पिनाकपाणी | धन्य धन्य धन्य ती ॥२॥