पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय नववा. श्लोक. .( मालिनी.) ........... परतुनि सदनाला येउनी सर्व वार्ता ॥ कळवि परि तयाला लागली फार चिंता ॥ .. प्रियसखि मग त्याला बोलली प्राणनाथा ॥.. पुजन तरि कसे हो शंभुचे होय आतां ॥ १ ॥ साकी. शिवदिक्षा ती परम कठिणची निष्ठा पाहे देव ॥ शवरी बोले प्रिया लागुनी वचनी माझ्या भाव ।। ठेवुनि ऐका हो ॥ शंका मानं आणुं नका हो ॥ १ ॥ पाकसदानं मी बसुनी आतां अग्नि लावुनी घेते ॥ शिवपूजा ती पूर्ण करावी अनि मम भस्माते ।। शुचिर्भूत होऊनी । घेई अग्नी लावूनी ॥ २ ॥ कलेवराचे भस्मचि झालें शबर भस्म ते घेड। सदाशिवाशी प्रेमें चर्चुनि आनंदित तो होई ।। भोळा शंकर तो ॥ दासाचे धैर्यचि बघतो ॥ ३ ॥ शिवध्यानीं तो तल्लिन झाला नाहीं भानचि ज्याला ॥ भार्येनें तो देह जाळिला आर्ति करूनी तिजला ॥ पूर्वाभ्यासें तो ॥ प्रिये मणुनी मग बाहतो ॥४॥ नैवेद्य शीघ्र अर्पण करि बा एकार्ती ती होतां ॥ विलंब होतां क्षोभ येतसे फाराचे त्या गुहताता ।। क्षमा नच तिळभरी ॥ जाई क्षोभुनी मदनारी ॥५॥ नैवेद्य आण सत्वर ललने ऐसें मग तो बाही ॥ नैवेद्य करीं घेउनि शबरी उभी पाठिशी राही ॥ तेव्हां ती शबरी ॥ दिसे रंभेसम सुंदरी ॥ ६ ॥