पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. राजा जवळी येऊनि बोले ।। लिंग मला हे नृपा मिळाले ॥ राजा बोले लिंग चांगलें ॥ परि भाव पाहिजे ॥ २ ॥ व्यर्थ पुजा ती कशास व्हावी ॥ दंभ करोनी लोका दावी ।। कासार जसा प्रतिमा ठेवी ॥ विक्रय करण्याला ॥ ३ ॥ ब्राह्मण वे मैंद हिंडती ॥ वाट लुटाया साधू होती है। ब्राह्मण साधू ह्मणुनी फसती ॥जन बहतचि ते ॥ ४ ॥ कालनेमि तो साधु होउनी ॥ वाट लुटाया बैसे येउनि ॥ देव पुजा ती भावा वाचुनि ।। व्यर्थ तरी जाण ॥ ५ ॥ श्लोक ( इंद्रवज्रा.) कैसा पुजेचा क्रम सांग राया ॥ पूनीत जेणें मम होय काया ॥ पूजेत वापा बहु भेद राही ॥ आणी चिताभस्म शिवास वाही ॥ १ ॥ श्लोक (शिरवरिणो.) विनोदें सांगे तो नपतिहि चिताभस्म शबरा || चिताभस्मावीणें कधिहि नच पूजी शशिधरा ॥ खरें मानूनीया वचन तरि तें जाय सदना ॥ प्रियेला सांगूनी निशिदिानं स्तवी पंचवदना ॥१॥ मुहूर्ते स्थापी तो निज सदनिं तें लिंग बरवें ॥ चितेचे आणी हो पुजनसमयीं भस्माचे नवें ॥ जई एकार्ती तो फिरवि तई नैवेद्य ललना ॥ समी, आणी ती, शवर तरि तो पंचवदना ॥ २॥ समर्पूनी दोघे स्तविति मग ते जान्हविधरा ॥ अशी निष्ठा देखे नवल मग तो दाखवि जरा ॥ .. चिताभस्माला हो तुट पडलि ती एक दिवशीं ॥ . महीं हिंडे भारी परि नच तया प्राप्त सरशी ॥ ३ ॥