पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.. अध्याय नववा. ११५ त्रिबोटी लावितां गोहत्याचे परी ॥ अभक्ष भक्षण ते पापचि जातें दुरी ॥ चाल ॥ भस्माचा तो ऐसा महिमा शंकर सांगे तरी ॥ १॥ दिंडी वामदेवाने ब्रह्म राक्षसाला ॥ भस्म महिमा तो सर्व विदित केला ॥ दिव्य यानचि ते येत त्यास न्याया। दिव्य त्याची जाहली असे काया ॥ १॥ त्यास नेले मिरवीत शिव पदाशी ॥ ऐक्यरूपी माक्ति ती मिळे त्यासी ॥ वामदेवहि तो पर्यटणा गेला ॥ संत संगें तो असुर मुक्त झाला ॥ २॥ कामदा. (या चालीवर.) मंत्र तिर्थ ही विप्र देवता ॥ औषधी गुरू यज्ञ भाकिता ॥ भाव त्यावरी ठेवती जसा ॥ देव त्यास तो पावतो तसा ॥ १ ॥ श्लोक. ( इंद्रवज्रा.) पांचाळ देशी नृप सिंव्हकेत ॥ शत्रूस भासे राणं कुंतिसूत ॥ तो एक वेळी मृगयेस गेला ॥ घेऊनि संगहि निषादमेळा ॥ १ ॥ श्लोक. (शिखरिणी.) असा हिंडे राजा शवर बळ घेऊन वन तें ॥ वनी त्याहो देखे शिव सदनही भग्न परि तें ॥ अशा देवागारी शबर शिरला भाव धरुनी ॥ ह्मणे देवा शंभो मम अघ तरी टाक हरुनी ॥ १ ॥ अंजनोगीत उन्मळोन तें दिव्य लिंग ही ॥ पडले होते नयनी पाही ॥ पंचसाह ते अभंग देहीं ॥ शबर तें घेई ॥ १ ॥