पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय नववा. दिंडी. विप्र होता एक रे पूर्व काळी ॥ शूद्र ललना पाहुनी मिठी घाली ॥ होइ रत तो तिजसवें सर्वकाळ ॥ जिवे मारी पति तिचा काय बोल ॥१॥ विप्रप्रेता टाकिलें दूर जेव्हां ॥ प्राण त्याचा दूतची नेति तेव्हां ॥ जाच बहुतचि तो भोगितसे तेथें ।। पापि लोकांची दया नसे जेथें ॥ २ ॥ आर्या इकडे कैसें झालें, ऐका हो वर्तमान ते आतां ॥ शिव सदनी भक्त बसुनि, प्रेमें पुष्पेंच वाहती ताता ॥ १ ॥ शिव सदना पुढती स्या, पडले होतेंच भस्म हो फार ॥ तेथें श्वान सवेगचि, बैसे भस्मांत जाउनी स्थीर ॥ २ ॥ भस्म चर्चितांगें ते, विष प्रेतास पाहुनी धांवे ॥ प्रेता सन्निध जाउनि, योजी स्वमनांत त्यास हो खावे ॥ ३ ॥ मुख फिरवितांच लागे, कुणपासी भस्म तेंच प्रेताच्या ॥ भस्म स्पर्शे जळाल्या, विप्राच्या अमित राशि पापाच्या ॥ ४ ॥ नरकांतुनि काढुनि त्या, शिवदूती बसविला विमानांत || जाउनि कैलास नगी, शंभु पदी राहिला अनंदांत ॥५॥ अंजनीगीत भस्म महिमा ऐसा परिसुनी ॥ राक्षस बोले कर जोडोनी ॥ वरि वरि लागे गुरुच्या चरणीं ॥ ह्मणे दया करावी ॥१॥ भस्म कोणते उत्तम तरि तें ॥ लावू कवणेपरि देहाते ॥ जेणे होई तोष हराते ॥ मार्ग तो सांगावा ॥ २ ॥ . (भीमक बाळा ह्मणे नृपाळा ) या चालीवर. मंदर गिरि तो परम पवित्रचि उंच योजने किती तरी ॥ अकरासहस्र ऐसे जाणा त्रिनेत्र वसतो तया वरी ॥