पान:संगीत शिवलीलामृत.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११२ संगीत शिवलीलामृत. भयानक भूतें भीती दाखवीती ॥ लिंग खाबबीती छेदूनीया ॥ भूमीत शरीर रोवूनी टाकिती ॥ शर मार करीती वरती हो ॥ शूळावर मग पालथे घालीती ॥ मुसळे वरती मार देती ॥ १ ॥ साकी नरकामध्ये टाकिति नंतर ज्याचा अंत न लागे ॥ कांच शिशांचा करुनी रस बह कराविति प्राशन वेगें ॥ तप्त सळ्या नाकों ॥ बहु दुःखचि ते होई की ॥१॥ अंतारक्षांतहि असिधारे ते बसविती नेऊनि जेव्हां ॥ पायीं बांधुनि जड पाषाणचि बहुत यातना तेव्हां ॥ भोगिले दुःख जरी । तेथें मरणाच नाहिं तरी ॥ २॥ ऐसें स्वामी दुःख भोगिले बहुतचि, वर्षे तीन ॥ यावरि मजला ढकलुनि देती पापी मी जाणून ॥ व्याव्र योनि आली ॥ मजला स्वामी त्या वेळी ॥ ३ ॥ दुसरे तिसरे जन्मी देवा अजगर वृक मी झालों ॥ सूकर सरडहि सारमेय मी सृगाल योनित आलो ।। अठवा गवय तरी ॥ मर्कट गर्दभ नकुळ वरी ॥ ४ ॥ वायस बक वन कुक्कट गृध्राच बिडाल मंडुक कूर्म ॥ . मच्छ त्यावरी मूषक उलुकहि द्विरद उष्ट्र की जन्म ॥ . निपाद झालो मी ॥ आतां राक्षस मी स्वामी ॥ ५ ॥ गंगास्नानें पाप जळतसें अत्री नंदन ताप ॥ कल्पवृक्ष तो दैन्य हरूनी देतो सुख तें अमुप ॥ पाप तापचि दैन्य ॥ संत संगें जाइ जळून ॥ ६॥ तुझ्या दर्शने पावन झालों पुनीत झाली काया ॥ उपदेश तरी करुनी मजला उद्धार मज गुरु राया ॥ वामदेव तो बोले ॥ काय तरी हो त्या वेळे ॥ ७ ॥