पान:संगीत शिवलीलामृत.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय नवा.. . १११ मम नयन ते टाकिति फोडुनी ॥ कुंभी पाकी शिजविति धालुनी ॥ तप्त लोह दंड घालिति कर्णी ॥ रेत कंड ही ॥ रक्त कुंड ही ॥ त्यांत पचविती मजला पाही ॥ सांडस लावूनि माझ्या देहीं ॥ मांस तोड़नी क्षारोदक ही। वरी शिंपती माया नाहीं ॥ जिव्हा नाशिक कर्ण पाद हीं ॥ तीक्ष्ण शस्त्रे छेदिति पाही ॥ अंगाचा तो भाता काढिती ॥ तप्त शस्त्र तें शिरी रोविती ॥ शस्त्र घेउनी शिश्न छेदिती ॥ तप्त अर्गला गुदी घालिती ॥ सर्व देहि मग टिपऱ्या लाविती ॥ पाश बंधन सवचि करिती ॥ चरणी ग्रीवा नेउनि बांधिती || बोटी बोटी सया रोविती ॥ वषणाचें तें चोच करिती ॥ हाती पायीं बेडि घालिती ॥ नरका मध्ये नेउनि टाकिति ॥ वर्षे सहस्र त्यांतचि ठेविती ॥ बाहेर काढिती ॥ दात पाडिती ॥ ग्रीवेसी मग पाश घालिती ॥ आपली विष्टा खा खा ह्मणती ॥ देहाचे ते तकडे करिती ॥ शाम सबल ही श्वान धांवती ॥ चरचराच ते फाडुनि टाकिति ॥ शिरास्थी ही मांस उकरती ॥ लोहार्गळा ही तप्त करूनी ॥ पृष्ठी हृदयीं लाविति नेउनी ॥ चूणाचे करिती उखळी घालुनी ॥ माझे दोष ही अमित जाणुनी ॥ . अभंग तीक्ष्ण औषधीचे रस आणवीती ॥ मग ते ओतिती कानां मध्ये ॥ वृश्चिक कूपांत लोटुनी हो देती ॥ बहुत विपत्ती भोगील्या मी ॥ जयाचें तें वीष बहुत दुर्धर ॥ ऐसे ते विखार डसवीती ॥ शिखेस तो अग्नि लावुनि सत्वर ॥ भाजिती शरीर दया कैची ॥ नेऊनी पर्वती ढकलून देती ॥ कांतडी काढीती अंगाची हो ॥ ऊर्ध्व नेऊनीया टांगन ठेविती ॥ खाली आपटीती क्रोध भरें ॥ इंगळाचें तें हो आंथरूण करती ॥ बळें निजवीती नेऊनीया ॥ पाषाण आणूनी मस्तकी घालीती ॥ फोडून टाकती काय सांगू ॥१॥ अभंग लोहाचें तें चणक तप्त हो करूनी ॥ खा खा ह्मणुनीया मार देती ॥ ओष्ठ धरूनीया फाडून टाकिती ॥ ग्रीवेसी बांधीती पाषाण ते ॥ . गजपदाखाली चूर्ण करवीती ॥ तप्त नार देती प्राशावया ॥