पान:संगीत शिवलीलामृत.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. वेदशास्त्र मी तुच्छ मानिलें नाहीं केला धर्म तरी ॥ ब्रह्महत्यादि पा केली नारि अणल्या बहु मंदिरीं ॥ निय नूतन स्त्रिया भोगि मी देश धुंडुनी बहुत परीं ॥ एकवार जी नारि भोगिली पुन्हां न पाहिले वदन तरी ॥ बंदि घालुनी रक्षण केल्या तळमळती त्या बहु अंतरीं ॥ मेम भीतीने विप्र सर्व ही जाति सोडुनी देश दुरीं ॥ साकी. अशा रितीने किती भोगिल्या ऐका त्याहो नारी ॥ ब्राह्मण, क्षत्रिय तीन चारशे वैश्य स्त्रिया किती तरी ॥ दहाशते जाणा ॥ शुद्राच्या सहस्र ललना ॥ १ ॥ चांडाळाच्या चारशतें त्या मांग कन्यका त्याही ॥ एक सहस्रचि चर्मक कन्या पांच शतें त्या पाहीं ॥ अगणित त्या कुलटा ॥ केला संचय बहु मोठा ॥२॥ रजक महारािण चार पांचशे तितुक्या वृषली नारी ॥ इतर वर्ण ते मज वदवेना गणना नच होइ तरी ॥ इतक्या भोगोनी ॥ तृप्ति नसे हो कधी मनीं ॥ ३ ॥ दिंडी मद्यपानाचा नित्य नियम केला ॥ निय भक्षी मी फार अभक्षाला ॥ असें होतां क्षयरोग मज झाला ॥ त्याच रोगाने मला मृत्यु आला ॥ १ ॥ दूत नेती बांधुनी मला जेव्हां ॥ मला नेउनि लोटिले नरकिं तेव्हां ॥ यम पुरीचे ते दुःख सांगवेना ॥ परी चरणीं सांगतां राहवेना ॥ २ ॥ कटाव ताम्रभूमि ती तप्त करूनी ॥ नेती देवा मज त्या वरुनी ॥ लोहस्तंभ ही तत करूनी ॥ मिठे मारविती त्या मज कडुनी ॥ कढई मध्ये तेल घालनी ॥ तत करिति तें आग्ने लावुनी ॥ बुडविति मजला त्यांत नेउनी ॥ नरक मत्र ह्या मुखांत दोन्ही || घालति माझ्या पापी ह्मणुनी ॥ महा क्षार ही रस आणूनी ॥ मुखी घालिती मज पाडूनी ॥ तीक्ष्ण चंचुचे गृध्र येउनी ॥