पान:संगीत शिवलीलामृत.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. भध्याय नव्या. दुष्ट राक्षसा तैसें झालें मात त्याची ती फिरली ॥ असुर भाव तो दूर पळाला सत्ववृत्ति ती झाली ॥ बामदेव स्परों ।। राक्षस पवित्र झालासे ॥ ३ ॥ पद ( दिसली पुनरपि गुप्त जाहली, ) या चालीवर. पिशिताशन तो उद्धरिलासे अंगस्पर्श करुनि जरी ॥ धृ०॥ हे ही ज्याला भान नसे हो होति समाधी त्यास तरी ॥ सुख दुःख तसें शीतोष्णहि तें नच ठावें हो त्या शरिरी ।। निदिति किंवा वंदिति हे ही नाहिं ठावके त्यास तरी ।। शरिरिं भोग की रोगाचे दारुण हे ही कळेना तीळभरी ।। देशि विदेशी हे ही कळेना असा हिंडतो भूमिवरी ॥ पिशिताशन ॥१॥ साकी. दिव्य रूप तो राक्षस होउनि लागे त्याच्या पायीं ।। सहस्र जन्मापासुनि तेव्हां आठव त्याला होई ॥ जलपान मानसीं ॥ देई तेजचि काकाशी ॥ १ ॥ अमृत प्राशन करितां सहजचि देवपणा तो येई ।। शशिकिरणाने चंद्रकांत तो द्रवुनी जैसा जाई ॥ तैसा उद्धरला ॥ राक्षस दिव्य रूप झाला ॥ २ ॥ तुइयां दर्शने पावन झालों ज्ञानचि झाले मजला ॥ सहस्र जन्मिचा आठव झाला सर्व सांगतो तुजला ॥ पापें जी घडली ॥ पंचवीस जन्माची सगळीं ॥ ३ ॥ पद. __ (दो दिवसाची तनु ही साची, ) या चालीवर. गुरुवर्या मी दुर्जय नामें राजा होतो भूमिवरी ॥ यौवन मद मैं अंगी भरला दुराचार मी फार करी ॥ ब्राह्मण सारे फार पाडिले गेले त्रासुनि बहुत परीं ॥