पान:संगीत शिवलीलामृत.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- संगीत शिवलीलामृत. ( भला जन्म हा तुला लाधला, ) या चालीवर.. अनुग्रहास्तव शंकर विचरे रुपें धरुनि ही बरी ।। जड जीव तारक व्हाया तरी ॥ धृ० ।। कार्याकार्यचि सारुनि कारण आत्मस्वरूपी तदा ।। पावे समाधान सर्वदां ॥ देहत्रय रहित विधिनिषेधहिन, प्रवृत्तिहुनि वेगळा ॥ निरंकुश जाणा तरि तो भला ॥ ब्रह्मारण्यीं मातंग फिरे तसा अभंगाच दिसे ॥ ज्याला वेदहि वर्णीतसे ॥ गगनहिं अंगा रुततें ह्मणूनी. सारी दूरचि वरी ।। हेतु दृष्टांत वर्जित तो तरी ॥ तेजाचें तें दाहकत्व ही ज्याने हो जाळलें । उर्वीचें कठिणत्वहि मोडिलें ॥ चाल ।। प्रभंजनाचे ही चंचलत्व पळविलें ॥ आर्द्रत्व काढुनी जीवन शुद्ध करविलें ॥ पिंड ब्रह्मांड हे जाळुनि भस्म चार्चलें ॥ चाल ॥ जडभरतचि वा शुका सारिखा क्रौंचारण्यांतरीं ॥ देखे शिवरूपचि तो तरी ॥ १ ॥ साको महा भयानक शरीर अद्भुत शेंदुर दिसतो भाळी ॥ लळलळीत ती जिव्हा मोठी मुखा बाहेरि आली ॥ बहु जीव भक्षिले ॥ अपरामित पापची केलें ॥ १ ॥ ऐसा पापी ब्रह्मराक्षसचि हिंडत हिंडत गेला ॥ वामदेवं तो नयनी पाहुनि मिठी घालि कंठाला ॥ • लोहें परिसासी ॥ होई सुवर्ण तें सरसी ॥ २ ॥