पान:संगीत शिवलीलामृत.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय नव्या. अध्याय ९ वा. श्लोक जुडेन भवसागरी जरि तुला नये बा दया ॥ किती तरि तुला स्तवू शाशिधरा हरावें भया । असंख्य तरले पदी शरण येति जे पापिरे ॥ 'असें असुनि शंकरा मजविशी दया कां सरे ॥१॥ साकी. शिवनामाचा घोष निरंतर पुनर्जन्म मग कैचा ॥ कळीकाळ तो त्यांनि जिंकिला करि जप शिवनामाचा ॥ तुजला तारक तो ॥ अंती पदास मिळवीता ॥ १ ॥ धनेच्छा जशि प्रबळचि असते तैशी होवो नामीं ॥ किंवा विषयीं असक्ति दावी असतो नर जो कामी ॥ तैशी हो नामीं ॥ नेइल मग ती शिव धामीं ॥ २ ॥ धन्य धन्य ते समजा प्राणी जे रतती शिव ध्यानीं ॥ वामदेव तो ऐसा होता ऐक कथा ती श्रवणीं ॥ सत शौनकाला ।। वदती ते मी तमाला ॥ ३ ॥ शिवध्यानीं रत फिरे काननीं भेद रहित जो पाही ॥ वस्त्रदिशा ज्या भस्म चचुनी सदां दिगंबर राही ॥ शिवमय विश्वचि हें ॥ मानुनि जो हिंडत राहे ॥ ४ ॥ श्लोक अक्रोध वैराग्य क्षमा दया ही ॥ निर्लोभ दाता भय शोक नाहीं ॥ पंचेंद्रिये ती वश ही जयाला ॥ ना मान इच्छी नच दुःख ज्याला ॥ १ ॥ कांता मुलें ही नलगेच कांहीं ॥ व्यासंग ज्याला कसलाच नाहीं ॥ मौनी न बोले शिव नाम घेई ॥ या मौन बोला इतरास काई ॥ २ ॥