पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत जातों आतां जग सोडून ॥ मी वाचुन काय करूं ॥ देखुनि राया तुजला फार ॥ केला शोकचि तो अनिवार ॥ राया धांवुनि ताप निवार ॥ झाला भार व्यर्थ परी ॥ १ ॥ (भला जन्म हा तुला,) या चालीवर. क्षात्र कुळीं तूं जन्म पावुनि डाग कसा लाविला ॥ शरणागत दूर कसा दवडिला ॥ धृ० ॥ गुरुने तुजला खड्ग दिलेना? काय तरी पाहुनी ॥ धिकार असो तुज लागनी ॥ द्वादश सहस्र बळ नागाचे मंत्रास्त्र सर्व तरी ॥ दिसतो भाराचि देहावरी ॥ धिक आश्रम तो धिक श्रोता तो धिक वक्ता मानिती ॥ जे शंकरास कधिं न पूजती ॥ संतति संपति व्यर्थ जाण तरि जो न रक्षि द्विजवरा ॥ धिःकार असो ऐशा नरा ॥ चाल | पतिव्रता नाहीं नारी ती पापिणी । पत्र नव्हे तो जननीस करी जाचणी ॥ धिक शिष्याच तो न नमी गरु पाहुनी ॥ चाल ॥ जननीला कां त्रास दिलासी व्यर्थ भार वाहिला ॥ . अंजनीगोत निस्तेज मुख तें भद्रायूचें ॥ झाले ऐकुन बोल तयाचे ॥ अधोवदन तो करूनी वाचें ॥ बोले विप्राला ॥ १ ॥ दिंडी. तुला देइन मी इच्छिलेच आतां ॥ करी पुढतो तूं रूपवती कांता ॥