पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय आठवा... कस्तूरीमग वासित शीला ॥ करती त्या वनिच्या ॥ ३॥ . कीर्तिमालिनी संगें घेउनि ॥ क्रीडत असतां जळी जाउनी । अपूर्व तें तो देखे नयनीं ॥ दूरवरी तेव्हां ॥४॥ साकी ब्राम्हण पुढती कांता मागें ऐसी धांवत येती ॥ उर्ध्वकराते करुनी तेव्हां दीर्घस्वरें बोभाती ॥ राया रक्षीरे ॥ व्या मजला धरिलेरे ॥ १॥ परम सकुमार लावण्यवती माझी कांता मागें ॥ राहिलि तिजला व्याघ्र भक्षितो नपा धांव बा वेगें ।। धांव नृपालारे ॥ आणुनि देई कांता रे ॥ २ ॥ श्लोक. गजबज परिसूनी राव तो धांवला हो ।। झडकरि तरि लावी चाप संधान तो हो । विजसम शर सोडी व्याघ्र तो मारण्या हो । नच गणि परि जाई घेऊनी स्त्रीस तो हो ॥ १ ॥ श्लोक ( अनुष्टुप.) राया पुढे येउनी तो ॥ आक्रोशे शोक हो करी ॥ . राया समक्ष तुझिया ॥ घडली गोष्ट ना बरी ॥ २॥ पद. ( नकळे होइल गति कैशी, ) या चालीवर. कांते सोडुनि तूं मजला ॥ गेलिस काय तरी ॥ धृ०॥ तुजविण मजला गृह हे शून्य ॥ सखे भासते जेवि अरण्य ।। तोषित करण्या कोणि न अन्य || कैसा धन्य हो तरी || तुजविण आतां काय जगून ॥ व्यर्थ भासतें तुज वाचून ॥