पान:संगीत शिवलीलामृत.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय आठवा. (शंकित का होसेि ) या चालीवर. . नलगे लग्नचि तें ॥ रायारे ॥ ७० ॥ स्त्रीहीनाला साधन कैसें जगी नसे त्या सुख तें ॥ अंधा पुढती दर्पण धरणे व्यर्थ जसे ते दिसते ॥ . संन्यासचि तो तरुणा देणे वा मढा ग्रंथचि ते ॥ वृद्धपणीं तें लग्न व्यर्थची जैसे वृत तृषिताते ॥ क्षुधिताला त्या व्यर्थ अक्षता वा गंधाच ते त्याते ॥ चिंतातुराला गायन व्यर्थचि तैसें राज्यचि माते । यारतब राया आणुन देई झडकरि मम कांतेते ॥ १ ॥ अंजनोगीत. माझी कांता कीर्तिमालिनि ॥ जा वा विप्रा तिला घेउनी ।। दुसरि गोष्ट ती न दिसे नयनीं ॥ दिधली मी तुजला ॥ १ ॥ पद. ( उरला भेद न ज्या कांहीं, ) या चालीवर. नाही पापचि या देहीं ॥ मग ते भय कोठे राहीं ॥ धृ०॥ घेइन मी तव कांतेला ॥ नाही भीतचि पापाला ॥ . मम तप लाजवि मेरूला ॥ उंचचि गेले शिखराला ॥ ठेकुळ काय सागराला || डहळिल पडुनी ते त्याला || आकाश न मळे धुळिनेही ॥ तैसा पवित्र मी पाहीं ॥ १ ॥ साकी मम बळ गेले व्याघ्राने जै द्विजांगनेला नेलें ॥ आतां कांता विप्रा अर्मुनि भक्षिन मी या वेळें ।।. अग्नी काटें तीं ॥ अश्रू नयनी बहु येती ॥ १ ॥