पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. जन्मो जन्मी शिवपूजा ती प्रेमभरें हो जार घडली ॥ पतिव्रता स्त्री परम सुंदरी पुत्र मान्यता बहु झाली ॥ सर्वज्ञ गुरू उदार मोठा रत्ने दुर्मिळ ही सगळी ॥ १ ॥ साकी . भद्रायूला राज्यी बसवुनि वज्रबाहु तो गेला ॥ सुमतीसह मग हिमकेदारों आचरि उग्र तपाला ॥ शेवटिं तो गेला ॥ उद्धरुनी मग स्वर्गाला ॥ १ ॥ भद्रायूनें मग बा केले राज्य सुखाने पाही ।। धन्य गुरू तो धन्य शिष्य हा उपमा द्याया नाहीं ॥ धारण भस्माचें ॥ पाठ करी शिवकवचाचे ॥ २ ॥ कीर्तिमालिनी संों घेउनि एक वार तो गेला ॥ . वनविहार तो करण्यासाठी एका उद्यानाला ॥ पाहिं वनश्रीला ॥ होई तोषचि चित्ताला ॥ ३ ॥ हिंडो कोळि नारळि पोफळी खजरी ती ॥ अशोक चंदनाहे तरू शोभताती ॥ निंब मलयागर आंच फणस भारी ।। जांच पिंपळ डाळिंब उष्ण वारी ॥ १ ॥ अजिरौटुंबर पारिभद्र ऐसे ॥ गगन भेदिति की कार असे भासें ॥ सधन शीतळ पाट ही वाहताती ॥ सूर्य किरणा विश्रांति तिथे होती ॥ २॥ पद. ( गजानना दे दर्शन, ) या चालीवर, जाइ जुई ती मालति शेवती ।। गुलाब चंपक बकुळ हि दिसती ॥ द्राक्षाला ते घोस लोंबती ॥ शोभा देती ते ॥ १॥ नागवेलि ही कनकवेलि ती ॥ पोवळवेली जायफळी ती ॥ फळभारे ती फार शोभती || सुवास तो चाले ॥२॥ . बदके चातक मयुर कोकिला ॥ चक्रवाक ते बघ त्या नकुला ॥