पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय आठवा. क्षमेला हा पात्र गे नसे कांहीं ॥ क्षमा करुनी परि तूंचि धन्य होई ॥ बिंदुचा तो सिंधूच करुनि त्वांगे ॥ दाखवीला मजलाच सखे तो गे ॥ २ ॥ साको. उद्वार तुवा माझा केला धन्य तुझे गे कृत्य ॥ पुत्र मुखाही तूंचि दाविलें राज्य तुझें हें सस । ऐसें बोलोनी ॥ त्वरित निघाला तेथूनी ॥ १ ॥ भद्रायही त्वरित धावुनी वंदी पद ताताचे ॥ कुरवाळिति मग परस्पराते दिसती शिव गुह साचे ॥ किंवा कच येतां ।। होई तोषचि तत्ताता ॥२॥ अवघ्राणुनी मस्तक त्याचे अंकों घेई त्याला ॥ दक्षिणांकि ती कीर्तिमालिनि पाहुनि सुख हो त्याला || समस्त नृप वदती ।। धन्य धन्य तूं वा नृपती ॥ ३ ॥ अंजनीगीत. पद्माकर मग वज्रबाहुला ॥ सुनय सुतासह त्यास भेटला ॥ बहु आनंद तो त्यास जाहला ॥ न वर्णने माते ॥ १ ॥ चार दिवस ते लग्न जाहलें ॥ अपार धनही आंदण दिधलें ॥ या चक सारे ताचि केले ॥ चित्रांगद भूपें ॥ २॥ सो घेउनी कीर्तिमालिनी ॥ पद्माकर सह जात तेथुनी ॥ निज नगराला सर्व तेक्षणीं ॥ जाते झाले हो ॥ ३ ॥ पद. ( नको कचा निशी बाहेर जाऊं, ) या चालीवर. वज्रबाहुचा तोष माइना गगनगर्मि तो त्या काळी ॥धृ०॥ सर्व करूनी अधिन सुमतीच्या पट्टराणि ती मग केली ॥ शत्रु सर्व ही अंकित करुनी सोडुनि दिधले त्यावेळी ॥ करभार त्यास ने न देउनि जिवदानें हो त्या दिधलीं ॥.... भद्रायू सम पुत्र व्हावया पुण्य पाहिजे बहु भाली । .......