पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृन. हेमरथाला वार्ता कळली शस्त्र नव्हे रे काळ ॥ पवन गती तो पळू लागला घेउनि दळ तात्काळ ॥ पाहुनि त्या नयनीं ॥ भद्रायू जातचि धावूनी ॥ ४ ॥ पद. ( माझ्या मनिचे हित, ) या चालीवर. हेमरथाचे केश धरूनी ओढनि तो नेला ॥ लत्ता प्रहार हृदयीं देतां अशुद्धचि ओकला ॥ धृ०॥ प्रधान सह तो रथी बांधूनी वज्रबाह सोडिला ॥ त्याचे शिरि ते पाट काढिले घेउनि शस्त्राला ॥ अर्धखांड ही अर्ध मिशी ती काढी त्या वेळां ॥ ज्या ज्या वस्तु अणिल्या त्याने जिंकनि राज्याला ॥ स्या त्या वस्तु हिरुनि घेउनी सोडी अवलाला ॥ भद्रायू तो धांवत जाउनि वंदी ताताला ॥ १ ॥ दिंडी. कोण तूं तें सांगरे मला बाळा || अपेशाचा डाग त्वां दूर केला ॥ शत्रवन्ही जाळीत मला होता ॥ मेघरूपी झालासि मला त्राता ॥१॥ श्लोक आला काय तरी उमा हृदय जो भक्तास तारावया ॥ किंवा येत रमापती झडकरी पाहूनि दुःखास या ॥ दोधे बाळ मला तसेच दिसती काही नसे न्यून हो ॥ धावूनी धरती कुमारचरणा राजस्त्रिया सर्व हो ॥१॥ दिंडी. मुखावरुनी उतरती निंबलोण || जाउं ओवाळुन सर्व तुज वरून ॥ ह्मणे भद्राय तुही नगरि जावे ॥ बांद घालूनी शत्रुते जपावें ॥ १॥