पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय आठवा. कामदा. ( या चालीवर.) जलज वाजवी बाळ तो तरी ॥ नाद ऐकनी शत्र अंतरीं ॥ भिउनि जाउनी ह्मणति ते मनीं ॥ कोण नाहिं हो रक्षितां जनीं ॥ १ ॥ डळमळे मही नाद ऐकुनी ॥ फणिपतीसही भीति ये मनीं ॥ दशदिशाहि त्या भरुनि जाति हो ॥ दिग्गजासही कंप येइ हो ॥ २॥ दिंडी. शंख नादें मूर्चीत शत्रु झाले ॥ भान त्यांचे सर्व ही लया गेलें ॥ रिते रथ ते धांवती दिशा दाहीं ॥ घेइ त्यांतुनि शोधून एक तो ही ॥ १ ॥ रथी दोघे बैसूनि बाण मार ॥ शत्रुवर ते करतीहि झोड फार ॥ वज्रबाहूचे वीर बघुनि बाळा ॥ ह्मणति कैवारी कोण कसा आला ॥ २ ॥ पाठिराखा देखिला नयनिं जेव्हां ॥ धैर्य आले फारची त्यास तेव्हां ।। मिळनि त्यांनी छेदिला शत्रु भार ॥ शेष दळ ते पळतसे फार दूर ॥ ३ ॥ प्रधानासह तो वज्रबाहु पाही ॥ मनीं बोले कोण हो अले हे ही ॥ हरीहर हे दीसती तरी माते ॥ बाळवेषं धांवले रक्षणाते ॥ ४ ॥ एक गुरुने शिकविले दिसे पूर्ण ॥ असे विद्या दोघांत सम समान ॥ राज नंदन पाहुनी प्रेम दाटें । आप्त माझा तो असे मला वाटें ॥ ५ ॥ साकी. भद्रायूच्या माराने ते शत्रू जर्जर झाले ॥ समर भूमि ती थोर माजली अपपर नाही कळलें ।। हेमरथहि आला ॥ धांवत समरचि करण्याला ॥ १ ॥ हेमरथाला जर्जर केले दोघा बाळांनी हो ॥ हनुमान भीम समाचे भासले तेव्हां त्याला ते हो ॥ पाहुनि तरि त्यांतें ॥ शत्रू थरथर कांपति ते ॥ २ ॥ भद्रायू तो शेवाट काढी खड्ग दिले में गुरुनें ॥ काळाग्नी वा काळ सर्प सम हातीं धरिलें त्याने ॥ पाहुनि तेजातें ॥ शत्रू भस्मचि होती ते ॥ ३ ॥