पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. ( धीर समीरे यमुनातीरे, ) या चालीवर, पद्माकर सुत, सुनय, वीर तो संगें घेउनि मग चाले ॥धृ०॥ गरुडा सम ते सर्प शत्रुचा मार्ग काढिती त्या वेळें ॥ तेव्हां भासे जणूं लहु कुश ते राम सहाया की आले ॥ पायौं क्रमिती भूमी सत्वर चोज मला तें बहु गमलें ॥ शत्रुभार तो जवळ देखुनी भद्रायू तो त्यांना बोले ॥ १ ॥ साकी वज्रबाहु सम वस्तू चोरुनि तस्कर सम कां पळतां ॥ उभे तरीरे क्षणभर आतां क्षात्रपणा का त्यजितां ॥ मजला जिंकूनी ॥ जावे मग त्या घेऊनी ॥ १ ॥ कर्ण नासिका कर चरणाते छेदिन तुमच्या आतां ॥ तस्करास हा दंड योग्यची नीचानो कां पळतां ॥ चोरुाने वस्तूला ॥ आतां जीवा सांभाळा ॥ २ ॥ .. अंजनीगीत अवघे जब ते मागे बघती ॥ बाळक दोघे तया दीसती ॥ विष्णू शिव की दोवे येती ॥ भक्का करितां ते ॥ १ ॥ . एक मृगांकाच एक मित्र हा ॥ एक वातुकी भोगिंद्राच हा ॥ एक रुद्र तो महा रुद्र हा ॥ त्यांना ते दिसती ॥ १ ॥ . साकी. बाणा मागे बाण सोडता वर्षति घन ते जैसें ॥ वीरा अंगों वाण खिळूनी भासति मयुरा ऐसें ॥ . तेव्हां शत्रू ही ॥ सोडिति बाणाते पाही ॥१॥