पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अभंग. (१५१) कोटीतरणीतेजाळ, कृष्ण देवकीचा बाळ, वेगी दावा हो ॥ २ ॥ करी स्वतांचे काज, न धरी लौकिकाची लाज, देह विडंबिलें आज, पाहुं चला यदुराज ।। ३ ।। सांडी शरीराचा रंग, चित्त झालेसे भंग, धरा कृष्णजीचा संग, पाहुं चला श्रीरंग ॥ ४ ॥ रामदासाचे आस, जीव नाहला उदास, धरूं मी कवणाची कास, सहज प्रकाश प्रगटला हो । पाहुं० ॥५॥ पद. तूं भज रे भज रे भज रे मानवा या रघुवीरा ॥ ४० ॥ नरदेही आलिया प्राणी | जो राम वदे ना वाणी ॥ नेव्हां यम पाडील धरणी । सोडविता नाही कोणी ॥ १ ॥ पळ पळ हे आयुष्य जाते । नरदेह नये मागुते ।। तं शरण जाय संतांते । ते निजपद दावितिल तूते ॥ २ ॥ रामदास विनंती करी । गुरुकृपा आम्हांवरी ।। सबाह्य अभ्यंतरी | व्यापक हरी चराचरीं ॥ ३ ॥ श्रीगुरुचे चरणकमल हृदयीं स्मरावे ।। ६० ।। नरतनु दृढनावसी बुडवुनि अति मूढपणे दुष्ट नष्ट कुकर शकर __तनु कां फिरावें ॥ १ ॥ निगमा निखिल साधारण सुलभाहुनी सुलभ बहु इतर योग याग पथीं उगी को फिरावे ।। २ ।। रामदास सांगे तुज अझुनी तरी समज उमज विषयविष घेउनिला फुकट का मरावें ॥ ३ ॥ भुपाळी. नित्य निरंतर गावे । देवभक्त आठवावे । तेणे भक्तपद पावे । देव ___पावे चितितां ॥ध्रु० ॥ राम सीता लक्ष्मण | भरत आणि शत्रुघ्र । जांबुवंत बिभीषण , सुग्रीव अंगद मारुती ॥ १ ॥ राम कृष्ण आणि यादव | गरुड उद्धव गोपी सर्व । भीष्म सात पांडव । कुंती द्रौपदी यशोदा ।। २ ॥ यत्रि वशिष्ठ आणि कौशिक । गौतम विश्वामित्रादिक । हम जमदग्नी वाल्मिक । ऐशी अनेक ऋषीकुळें ।। ३ ।।