पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५०) श्रीरामदासकृत येता जाता धंदा करिता । नामसंख्या मात्र धरितां ॥ १० ॥ ऐसा वर देतां जाण | दास झाला सुप्रसन्न ॥ ११ ॥ समाप्त.. ENA अथाज्ञानबालबोध.. रामदासकृत. बरें सत्य बोला यथातथ्य चाला | बहू मानिती लोक येणे तुम्हांला ।। धरा बुद्धि पोटी विवेकी मुले हो । बरा गूण तो अंतरामाजि राहो ।।१।। बरे दांत घांसूनियां तोंड ध्वावे | कळाहीन ते शूद्रमखी नसावे ॥ .. सदा सर्वदा यत्न सांडूं नये रे । बहूसाल हा खेळ कामा नये रे ॥ २ ॥ दिसामाजि काही तरी ते लिहावें । प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ॥ गुणे श्रेष्ठ ऊपास्य त्याचे करावे । बरे बोलणे सत्य जीवीं धरावें ।। ३ ।। बहू खेळ सोटा सदा लक्ष खोटा । समस्तांति भांडेल तो ची करंटा ।। बहूता जना लागि जीवीं झिजावें । भले सांगती न्याय तेथे भरावे ॥ ४ ॥ हिशेबी सदा न्याय सांडूं नये रे । कदाचीत अन्याय होतां धका रे ।। ननी सांडितां न्याय रे दःख होते । महासूख ते ही अकस्मात जातें ॥५॥ प्रचीती विणे बोलणे व्यर्थ वायां । विवेकाविणे सर्व ही दंभ जाया ।। बहू सज्जना नेटका साज केला । विचाराविणा सर्व ही व्यर्थ गेला ॥६॥ वरी चांगला अंतरी गोड नाहीं । तया मानवाचे जिणे व्यर्थ पाहीं ।। चरी चांगला अंतरी गोड आहे । तयालागि कोणी तरी शोधिताहे ॥ ७॥ सदां अंतरी गोडसे सोडवेना । कदां अंतरीं वोखटें देखवेना ।। ह्मणनी बरा गूण आधीं धरावा । महा घोर संसार हा नीरसावा ॥ ८ ॥ भला रे भला बोलती ते करावे | बहूतां ननाचे मुखें येश घ्यावे ।। परी शेवटी सर्व सांडूनि द्यावे । मरावे परी कीर्ति रूपे उरावे ।। ९ ।। बरा वोखटा सर्व संसार झाला । अकस्मात येईल रे येमघाला ।। म्हणोनी भले सांगती सत्य चाला | जनी दास तो शीकवीतो मुलांला १० इति रामदासकृत अज्ञानबालबोध समाप्त. - A पद पाहुं चला मुकंद पाहुं चला मुकुंद पाहुं चला मकंद ॥ ध्रु० ॥ बाई धरिं आपुला छंद, मुरलि वाजवितो मंद, गीत गातो गोविद ॥१॥ पांवा वाजवितो गोपाळ, गळां शोभे वनमाळ,