पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अभंग. (१४९) कायावाचामने रामरूपी मिळणें । तरी च श्लाघ्यवाणे रामदास्य ॥ ४ ।। परस्त्री नपुंसक होणे परद्रव्य न पाहणे । तरी च श्लाघ्यवाणे रामदास्य ॥५॥ नैसे मुखे बोलणे तैशी च क्रिया करणे । रामदास ह्मणे आवडी सगुणभजने ।।६।। -२४ हरिभक्ति करी धन्य तो संसारी । तयाचा कैवारी देवराणा ॥१॥ देवराणा सदा सर्वदां मस्तकीं । तयासी लोकीकी चाड नाहीं ।। २ ।। चाड नाही जनी राघवाच्या दासा । सार्थक वयसा दास म्हणे ॥ ३ ॥ २५ भोवता डोंगराचा फेर मध्ये देवाचे शिखर । पुढें मंडप सुंदर नव खणांचा ॥ १ ॥ चहूं खांबावरी रचना वरत्या चोविस कमाना. | काम कढाऊ नयना समाधान ॥२॥ नाना तरु आंबे वर दोहींकडे वृंदावन | वंदावनी जगजीवने वस्ती केली ॥ ३ ॥ पुढे गंगा वाहे दर्शनमात्रे दोष जाय । सकळ तीर्थाशी तो ठाय विश्रांतीचा ॥ ४ ॥ रामदासाचे भेटी येई अयोध्यानिवासी । भक्तिमहिमा चहूंदेशी वाढाया ॥१॥ महापापी लोक पूर्वी ही असती । ते ही पालटती जयाचेनि ॥ १॥ जयाचोन योगें होत असे उपाय । तुटती अपाय नानाविध ॥२॥ नानाविध जन सुबुद्धीचे होती । साधुचे संगती दास म्हणे ॥ ३ ॥ २७ साराचे ही सार सांगतो तुम्हासी । ह्मणा अहर्निशी राम राम ॥ १॥ सगुणमूर्तीचे करावे अर्चन । भुकेल्यासि अन्न यथा शक्ति ॥ २ ॥ सज्जनाची सेवा कीर्तनाची प्रीती । होईल विश्रांति दास म्हणे ॥ ३ ॥ आक्षेप्रमाणे परमार्थ । केला असे ने समर्थ ॥१॥ आतां देहाचा कंटाळा | आला असे जे दयाळा ॥२॥ आतां हेंचि मागणे | कृपा करूनियां देणे ॥ ३ ॥ ज्याची दर्शनाची इच्छा । त्याची पुरवावी आशा ॥४॥ ऐके सखया वचन । त्यासी देईन दर्शन ॥५॥ तेराअक्षरीमंत्राचा । जप करील नो साचा ॥६॥ त्याची संख्या तेरा कोटी । होता भेटेन मी जगजेठी ॥ भय न धरावें मनीं । बहु बोलिलो म्हणोनी ॥४॥ नलगे आसनी बैसावें । नलगे अन्न ही त्यजावे ॥९॥