पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१४८) श्रीरामदासकृत राघवाच्या गुणा न दिसे तुळणा | कैलासींचा राणां लांचावला ।। २ ।। देवाचे मंडण भक्ताचे भूषण । धर्मसंरक्षण राम एक ।। ३ ।। रामदास म्हणे धन्य त्याचे जीणे । कथानिरूपणे जन्म गेला ।। ४ ।। आम्ही देखिला विठोबा । आनंदे विठेवरी उभा ।। १ ।। तेथे दृश्याची जे दाटी । ते ची रुक्मिणी गोमटी ।। २ ॥ रामारामदास म्हणे । जो ओळखे तो ची धन्य ।। ३ ॥ लांचावोनी भक्ति लोभा । वाळवंटी असे उभा ॥ १ ॥ पदकी इंद्रनीलशोभा । प्रभेने शोभा उजळती ॥ २ ॥ भक्त पुंडलिके गोविला | जाऊं नेदी भांबाविला ।। ३ ।। विटे नोट असे ठाकला | भीमातीरवाळवंटी ।। ४ ।। भाग्य पूडलिकाचे । उभे दैवत त्रिलोकींचे ।। ५ ।। की जे तारूं भवसागरी | भीमातीरी विनटले ।। ६ ।। एके पुंडलिके करूनी नोडी । आम्हासी दिधली कल्पकोडी ।। ७ ॥ तुटली संसारसांकडी । रामदास म्हणतसे ।। ८ ।। जीवन्मुक्त प्राणी होऊनियां गेले | तेणे पंथे चाले तो ची धन्य ॥ १ ॥ जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी । निःसंदेह मनी सर्व काळ ।। २ ।। मिथ्या देहभान प्रारब्ध आधीन । राखे पूर्णपण समाधानी ।। ३ ।। आवडीने करी कर्म उपासना | सर्व काळ ध्यानारूढ मन ।। ४ ।। पदार्थाची हाणी हाता नये कोणी । जयाची करणी बोला ऐशी ।।५।। धन्य 4 ते दास संसारी उदास । तयां रामदास नमस्कारी ।। ६ ।। २२. संसार देखीला तरी पाहें सार । वायां येरझार पाडूं नको ।। १ ।।. पाडूं नको दुःखसागरी भापणा । म्हणे नारायणा ओळखावे ।। २ ॥ ओळखावे वेगी आपआपणाशी । संसारी सुटशी दास म्हणे ।। ३ ।। २३. विचारे संसार होतो देशधडी । सोनियाची घडी जात असे ।। १ ।। डावा तास गेला मोक्षपंया जाता । विवेके तत्वतां याशी नांवे ।। २ ।। सदा श्रीरामाचे भजन करितां । दास म्हणे चिंता दूर होय ।। ३ ।।