पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अभंग. (१४७) लावीतसे देह रामभजनास । रामीरामदास हरिभक्त ।। ६ ।। भक्तपणे रामनामाचा अव्हेर । करी तो गव्हार मुक्त नव्हे ॥ १ ॥ मुक्त नव्हे काय स्वये शूलपाणी । रामनाम वाणी उच्चारीतो ।। २ ॥ राम म्हणे शीव तेथे किती देव । बापडे मानव देहधारी ।। ३ ।। देहधारी नर धन्य ते संसारीं । वाचे निरंतरी रामनाम ।। ४ ।। रामनाम वाचे स्वरूप अभ्यंतरी । धन्य तो संसारी दास म्हणे ।। ५ ॥ १४. मी खरा पतित तूं खरा पावन । आतां अनमान करूं नको ॥ १ ॥ आतां कांहीं मज चिता ती ही नसे । तुझे नाम कैसे वाच येई ।। २ ।। समय घेतला नामासाठी भार । मम उपकार कासयाचा ॥ ३ ॥ रामदास म्हणे तो तुज ऊणे । सोयरे पिशन हांसतील ॥ ४ ॥ पतितपावना जानकीजीवना । वेगी माझ्या मना पालटावे ।। १ ।। मिथ्या शब्दज्ञाने तुज अंतरलो । संदेही पडलो मीपणाच्या ॥ २ ॥ सदा खळखळ निर्गुणाची घडे । सगुण नातुडे ज्ञानी गर्वे ॥ ३ ॥ रामदास म्हणे ऐसा मी पतित । मीपणे अनंत आतुडेना ॥ ४ ॥ टाळ धरूं कथा करूं। रामा लागी हाका मारूं ॥ १ ॥ ये रे रामा ये रे रामा । तुझी आवडी लागो आम्हा ॥ २ ॥ तुजविण गाईल कोण | ऊठ सांडिले मतूंपण ।। ३ ॥ रामदास पाहे वास । भेटी द्यावी सावकाश ॥ ४॥ रामभक्तिवीण आन नाहीं सार । साराचे हे सार राम एक ॥ १ ॥ कल्पनाविस्तारू होत असे सत्वरू | आम्हा कल्पतरू चाड नाही ॥ २ ॥ कामने लागोन विटलेसे मन । तेथे चाड कोण कामधेन ॥ ३ ॥ चिंता नाहीं मनी राम गातां गुणी । तेथे चिंतामणी कोण पुसे ॥ ४ ॥ कदा नाहीं नाश स्वरूप सुंदर । तेथे आम्हां हिरे चाड नाहीं ॥५॥ रामदास म्हणे रामभक्तीवीण । जाणावे ते ऊणे सर्व कांहीं ॥६॥ १८. सीतापती राम पतितपावन । गाती भक्तजन आवडीनें ॥ १ ॥ २५ चिंतामणी मनांत इच्छिलेली वस्तु देणारे रत्न.