पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१४६) श्रीरामदासकृत ८. गजेंद्र सावज पडला पानवडी । रामे तेथे उडी टाकियेली ॥१॥ प्रल्हाद गांजीतां कोण साहाकारी । स्वयेंची मैंरारी प्रगटला ॥ २ ॥ क्षत्रिये ब्राह्मणे गांजिली बापुडौं । रीमें तेथे उडी घातीयेली ॥ ३ ॥ तेहतीस कोडी देव पडीले 'बांदोडी । रीमें तेथे उडी टाकियेली ।। ४ । दासापायीं पडली देहबुद्धी बेडी । रामें तेथे उडी टाकियेली ॥ ५ ॥ रामदास म्हणे नका करूं शीण | रामें भक्त कोण उपेक्षीले ।। ६ ।। तुजविण देव मज कोणी नाहीं । माझी चिंता कांही असों द्यावी ॥ १ ॥ वैराग्ये कनिष्ठ अभावे वरिष्ठ । माझे मनी नष्ट संदेहता ॥२॥ विवेकें सांडिले ज्ञाने ओसंडिले । चित्त हे लागले तुझे पायीं। ३ ।। तुझे नाम वाचे उच्चारीत असे । अंतरी विश्वास धरीयेला ॥ ४ ॥ रामदास ह्मणे मी तुझे अज्ञान । माझें समाधान करी देवा ॥ ५ ॥ श्वीनाचिया पुत्रे कल्होळ मांडिला । कलहो लागला एकसरा ॥ १ ॥ भुंकितां गुरगुरी वासितो चि तोंड । वरती थोबाड करूनीयां ।। २ ।। एक ते भुंकती एक ते रडती । दास म्हणे गती निंदकांची ।। ३ ॥ मेरुचीया माथां ठेवनीयां पाव । जात असे राव कैलासींचा ॥१॥ कैलासींचा राव एक देव क्षोभला । देशधडी केला लंकानाथ ।। २ ।। लंकेच्या चोहटी मांडियेला खेळ । अग्नीचा कल्होळ घरोघरी ।। ३ ।। जाळीयेली घरे सुंदर मंदिरें । पावला कैवारे जानकीच्या ॥ ४ ॥ जानकीचा शोक दुरी दुराविला । यशवंत झाला रामदास ।। ५ ।। जाणावा तो नर देव ची साचार । वाचे निरंतर राम राम ॥ १॥ सगुणी सद्भाव नाही ज्ञानगर्व । तयालागी सर्व सारीखेची ।। २ ॥ निंदका वंदका सगट सांभाळी । मन सर्व काळी पालटेना ॥ ३ ॥ पालटेना मन परस्त्रीकांचनी । निववी वचनी पुढील्यासी ॥ ४ ॥ पदिल्यासि तो सख देत आहे । उपकारी देह लावीतसे ॥५॥ १६ मुरारी मुर नामक दैत्याचा शत्रु (मुर+अरि ). १७ क्षत्रिय कार्तवीर्य सहस्रार्जुन, १८ राम=परशुराम. १९ बांदोडी बंदीखाना. २० राम दाशरथी राम. २१ अज्ञान-मूड बालक. २२ श्वान=कुत्रा, २३ चोहटी-चवाठयावर. २१ कांचन-सोनें.