पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अभंग (१४५) ३. वाणी शुद्ध करी नामी । चित्त शुद्ध होय प्रेमी ।। १ ।। नित्य शुद्ध होय नामी । वसतां ही कामी धामीं ॥ २ ॥ कर्ण शुद्ध करी कीर्तन । प्राण शुद्ध करी सुमन ।। ३ ।। वंचा शद्ध करी रँज | मस्तक नमितां पदांबुज ॥ ४ ॥ करशुद्धी राम पूजितां । पादशुद्धी देऊळी जातां ।। ५ ॥ नेमें लिंग करी शुद्ध । अंतर निर्मळ करी गुद ।। ६॥ - रामपायों रहातां बुद्धी । रामदासा सकळ शुद्धी ।। ७ ॥ माझे सर्व जावे देवाने रहावे । देवासी पहावे भक्तपणे ॥ १॥ भक्तपणे मज देव ची जोडला । अभ्यास मोडला सर्व काहीं ॥ २ ॥ सर्व काही जो बा एक देव राहो | माझा आतभाव ऐसा आहे ।। ३ ।। नो हेत अंतरी देव तैसा झाला । हा दीन पाहिला कोणी एक ।। ४ ।। कोणी एक पुण्य ने होते संचले । दास ह्मणे झाले समाधान ॥ ५॥ दिनाचा दयाळु कीर्ति ऐकियेली । म्हणूनी पाहिली वाट तुझी ।। १ ॥ अनाथाचा नाथ होशील कैवारी । म्हणोनियां हरी बोभाईले ।। २ ।। तुजविण कोण जाणे हे अंतर । कोणासी नोजार घालूं माझा ।। ३ ।। दास म्हणे आम्ही दीनाहुनी दीन । करावे पालन दुर्बळाचें ॥ ४ ॥ आम्हा 'पतितांची सोंड केली नरी | आमचा कैवारी कोण आहे ।। १ ।। आम्ही भरंवसा कवणाचा धरावा । सांगावे केशवा दयानिधी ॥ २ ॥ तुजविण आला नाही त्रिभूवनी । धांवे चक्रपाणी दीनबंधु ॥ ३ ॥ पतितपावने ब्रीद हे बांधीले । तारावे "वहिले दासालागीं ॥ ४ ॥ पळशी तूं तरी नाम कोठें नेशी । आम्ही अहर्निशी नाम घोकू ॥ १ ॥ आम्हापासोनियां जातां नये तुज । ते हे वर्म बीज नाम जपूं ॥ २॥ देवा आम्हां तुझे नाम हो पाहिजे । मग भेटी सहज देणे लागे ।। ३ ।। भोळे भक्त आम्ही चुकलो चि कर्म । सांपडले वर्म रामदासा ।। ४ ॥ 6 धाम-घर. ५ सुमन=निष्कपट सरळ मन. ६ त्वचा कातडी. ७ रज-धूळ. (पायांची ). ८ अंबुज-कमल. ९ बोभाईले हाक मारिली. १० पतित-पापी. ११ सांड हेळसांड. १२ पावन-पवित्र करणारा. १३ ब्रीद-चिन्ह, निशाणी.. ११ वहिले-तात्काळ, १५ अहनिशि-रात्रंदिवस.