पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीरामदासकृत भुपाळी. उठा प्रांत काळ झाला । आपण राम पाहं चला। हा समयो टळला । मग अंतरा श्रीराम ।। १ ।। अवघे वानर मिळोनी । राम शोभे सिंहासनी ।। सभा घनवटली विमानी । अवना अंबर दाटले ।। २ ।। माया जानकी बिघडली । हाती प्रारब्धं चूकली ।। ते ची देहबुद्धी नाळली । मग आपंगिली श्रीराम ।। ३ ॥ सद्भाव भरताची भेटी । आम्हा राम हा जगजेठी ।। उतावेळ होऊनी कंठी । धांवुनी मिठी घातली ॥ ४ ॥ ने जे संसारी गांजीले । ते ते राम पाहूं आले ॥ तेणे आपणा ऐसे केले । रामदासे दातारं ॥ ५ ॥ अभंग. कोण कोठील आहेसी । आह्मा सांगें निश्चयेशी ।। १ ।। स्थूळ सूक्ष्म कारण । सांग तुझे कोण स्थान ।। २ ।। पिंड ब्रह्मांड रचना । अष्ट देही विवेचना ।। ३ ।। पिंड ब्रह्मांड तुझे स्थळ । किंवा तत्वांचा पाल्हाळ ।। ४ ।। सांग मायेचें अरण्य । किंवा तुझे ब्रह्मारण्य ।। ५॥ रामी रामदास म्हणे । आतां बोलावै स्मरणे ।। ६ ॥ चहूं निगमांचे बिन | कोणी सांगितले सहज ॥ १ ॥ तेणे प्राणी उमजला । पाहे विचार आपुला ॥ २ ॥ नित्यानित्य विचार । केला एक साचार ।। ३ ॥ दास म्हणे निरूपणीं । केली भूतांची झडपणी ।। ४ ॥ त्याचे पाय हो नमावे । त्याचे कीर्तन हो ऐकावे ॥ १ ॥ दुजीयासी सांगे कथा । आपण वर्ते त्याची पथा ॥ २ ॥ कीर्तनाचे न करी मोल । नेसे अमृताचे बोल ।। ३ ।। सन्मानीतां नाहीं सुख । अपमानितां नाहीं दुःख ॥ ४ ॥ किंचित दिले दातयाने । ते ही घेत असे आनंदाने ॥ ५ ॥ ऐसा असे हरिदास । लटकें न वदे रामदास ॥ ६॥ अवनी पृथ्वी. २ अंबर=आकाश. ३ निगम वेद.