पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१४२) श्रीरामदासकृत सूक्ष्मदेह. आकाशपंचक. तेजःपंचक. आप् पचक. १. अंतःकरण - विष्णु. श्रोत्र-दिशा. वाचा वन्हि. २. मन-चंद्रमा. त्वचा-वायु. पाणी-इंद्र. ३. बुद्धि-ब्रह्मा. चक्षु-सूर्य, पाद-उपद्र. ४. चित्त - नारायण. जिव्हा -वरुण. शिश्न-विधि, ५. अहंकार- रुद्र. प्राण-अश्विनौदेव. गुद-नर्ऋत्य. पृथ्वी, पंचविषय, तन्मात्रा, पिंडब्रह्मांड -ऐक्य; ब्रह्मांडींचा लिंगदेह १; अवस्था स्थिति २; अभिमानी विष्णु ३; विष्णुभुवन स्थान ४; शक्ति लक्ष्मी ५; भोग प्रविक्त ६; मात्रा उकार ७; सत्व गुण ८; पिंडी सूक्ष्म लिंग देह । विराटी हिरण्यगर्भ देवतामय ।। याते जाणूनि राहे । साक्षित्वे भिन्न ।। ४९ ।। पिंडी देह कारण, ब्रह्माडी अव्याकृति १, प्रळय अवस्था २, अभिमानी रुद्र ३, कैलास स्थान ४, शक्ति पार्वती ५, भोग आनंद ६, मात्रा मकार ७, तमोगुण ८, ऐसे देह जाणावे । जाणोनि साक्षित्वे निरसावे ।। आपण तो स्वभाव । भिन्न झाला ।। ५० ।। आतां पिंडी महाकारण ब्रह्मांडी मूळ प्रकृति १, सर्व साक्षी तूर्यावस्था २, सर्वेश्वर अभिमानी ३, निरालंब स्थान ४, ज्ञान शक्ति ५, भोग आनंदावभास ६, अर्ध मात्रा ७, शुद्ध सत्व गुण ८, ऐसे पिंडी ब्रह्मांडी अष्ट देह । सांगितले ययान्वये ।। निरसोनियां तूं राहे । साक्षित्वें ।। ५१ ।। यासी म्हणावे पंचीकरण । आतां महावाक्यविवरण ।। सद्गुरुकृपा पूर्ण । तूं चि आत्मा ।। ५२ ।। तो मी कैसा पहावा अनुभव । तत्वासारिखा गेला मीपणभाव ।। तेथे म्हणावया तो ठाव । उरला चि नाहीं ।। ५३ ।। या नांव जाणिजे निवृत्ती । योगीयांची परम विश्रांती ।। जन्ममरणाची भ्रांती । निरसून गेली ।। ५४ ।। रिघतां सद्गुरूसी शरण । मग कैचे भवबंधन ।।। पाविजे सायुज्यसदन । स्वानुभवे करूनि ।। ५५ ॥