पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीरामदासकृत ते नीळवर्ण दशदळ देव रमावर । लक्ष्मी शक्ति ॥ ३१ ॥ ऋषी तेथींचा पवन । दाहा अक्षर डफ जाण ।। दशांगुळ उंची जयाची खूण | अजपाजप साहा सहस्र ।। ३२ ।। चौथे हृदयस्थानी चक्र अनुहत । अग्निवर्ण देव उमाकांत ।। उमा शक्ति ऋषी अमरनाथ । द्वादशदळ द्वादशाक्षर कंठ जाणिजे।।३३॥ अजपाजप साहा सहस्त्र । आतां पांचवे विशुद्ध चक्र ।। तयाचे कंठ स्थान वर्ण शुध । नीव लिंग देव ।। ३४ ॥ अग्नि ऋषी अविद्या शक्ती । षोडशदल कंठ अक्षरे सोळा असती ।। अजपाजप सहस्त्र एक म्हणती । आतां अग्नि साहवे ।। ३५ ।। भ्रूस्थानी विद्युल्लता वर्ण | दोन दळे इडा पिंगळा शुषुम्ना नाडी जाण ॥ गुरु परमहंस देव हंस ऋषी खुण | दोन्ही अक्षरे हक्ष ।। ३६ ॥ अजपाजप सहस्र एक । फळ भोग मोक्षदायक ।। हे षड्चक्राचे कौतुक । संकेते बोलिले ।। ३७ ।। आतां षड़ चक्राचे मूळ अगोचर | अनंत प्रभार्णव मस्तक शिखर ।। ब्रह्मांड तयापासून शरीर | चाल तेथे प्रेम देव ।। ३८ ।। ज्ञान शक्ती ज्ञान देव ऋषी । सहस्र एक जप अजपेसी ।। अक्षरे दोन्ही सोऽहं तयासी । स्वयंज्योती म्हणती ॥ ३९ ॥ ऐशी सप्त चक्रे मिळोन । एकवीस सहस्त्र साहशे जप. जाण ।। परंतु मुख्य प्रचीत श्वासोश्वासी खुण । जाणीजे श्रोती ॥ ४० ॥ ऐसा स्थूळ देह नाणतां । आपण भिन्न तत्वतां ।।। जैसा धणी घरी असतां । तो धणी गह नव्हे ।। ४१ ।। या परी भिन्नपणे पहावे | साक्षित्वे अनुक्रमे निरसावे ।। आतां या परी पहावें । कारण देह || ४२ ।। स्थूळ सूक्ष्म जीव बोलिला । तो कारण मिश्रित झाला ।। अज्ञानयोगे जीव भूलला । जन्ममरण भोगी ।। ४३ ।। कारण देह १, अवस्था सुषुप्ति २, प्रज्ञाभिमान ३, हृदय स्थान ४, आनंद भोग ५, मकार मात्रा ६, तमोगुण ७, द्रव्यशक्ति ८. ऐसा देह कारण | याचा जाणता आपण ।। याची अनुभवाची खुण | प्रत्यक्ष सांगे ।। ४४ ॥ सांगतां तो भिन्न झाला | साक्षित्वे कारण देह निरसिला ।। आतां महा कारण बोलिला । जो देहत्रयास नाणता ॥ १५ ॥ १९ अमरनाथ इंद्र, ११ अगोचर अगम्य,