पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीरामदासस्वामीकृत पंचीकरणः ००:००-० ओव्याः मूळी ब्रह्म निर्विकार । निर्गुण अनंत अव्यय अपार ।। जैसे गगन घटमठादिअंतर । व्यागोनि असे अलिप्त ॥ १ ॥ तेथें अंहं असे स्फुरण झाले । त्यास माया ऐसें नांव पडिले ।। रूप शोधूनिया पाहिले । तो चंचल वायुस्वरूपी ।। २ ।। तेथे भेद दोन्ही असती । एक वायू दुसरी जाणीव जगज्ज्योती ।। वायूस म्हणावें प्रकृती । सूक्ष्मजडत्व म्हणोनी ।। ३ ।। जाणीव म्हणजे जाणणे ज्ञान । त्यास ईश्वरत्व अभिधान ।। एवं प्रकतिपुरुओळखण । जाणीजे ऐशी ।। ४ ।। त्यासी च म्हणावे षडणेश्वर । प्रकृतीपुरुषाचा विचार ।। अर्धनारीनटेश्वर । शिवशक्ती ।। ५॥ एवं मळ माया अवधी जाण । सकळ सृष्टीचे कारण ।। बाजरूपें ओळखण । अष्टधा प्रकृती ॥ ६ ॥ पंचभते तीन गुण । सूक्ष्मरूपे असती जाण ।। जैसा बीजी वृक्ष संपूर्ण । तैशी अष्टधा मूळ माया ॥ ७ ॥ मग ते चि गणां प्रसवली । म्हणोनि क्षामिनी बोलिली ।। ॐकाराची रचना झाली । तेथूनियां ॥ ८ ॥ अकार उकार मकार । अर्धमात्रा तो ईश्वर ।। एवं सूक्ष्माचा विचार । विवेकानुभवे जाणावा ॥ ९॥ पिंड कार्य ब्रह्मांड कारण | उभयांस मूळ माया अष्टधा नाण ॥ तेथे शिवशक्तीचे लक्षण । पिंडावरून जाणीजे ॥ १० ॥ नरनारी दोन्ही भेद । पिंडी दिसती प्रसिद्ध ।। मळी नसतां विशद । होतील कैसी ॥ ११ ॥ एवं बीजरूप मळ माया । तेथून झाली गुणमाया ।। सत्वगुण विष्णुदेह धरूनियां | पालन करी सृष्टीचे ॥ १२ ।। १ विकार बदल, फेरफार. २ व्यय-नाश. ३ घटमठादिअंतर=मडके व घर यांच्या आंतील पोकळी. ४ अहं मी. ५ अभिधान-गांव. ६ प्रकृति-माया (फसवणूक ). ७ पुरुष परमात्मा. ८ अष्टधा-आठ प्रकारची. विवेक-विचार. १० विशद स्पष्ट.