पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१३६) श्रीरामदासकृत रामदास म्हणे माझा । संसार तुज लागला ।। संशयो लागतो पोर्टी | बुद्धि दे रघुनायका ॥ १३ ॥ अष्टक ६. समाधान साधू-जनाचेनि योगे । परी मागुते दुःख होते वियोगें || घडीने घडी शीण अत्यंत वाटे । उदासीन हा काळ कोठे न कंठे ॥ १ ॥ घरे सुंदरे सौख्य नाना-परीचे । परी कोण जाणेल हे अंतरींचें ॥ . मनी आठवीता. चि तो कंठ दाटे । उदासीन हा काळ कोठे न कंठे ।।२ ॥ बळे लावितां चित्त कोठे जडेना | समाधान ते काहिं केल्या पडेना ।। न ये धीर नेत्री सदां नारे लोटे । उदासीन हा काळ कोठे न कंठे ।। ३ ।। अवस्था मनी लागली काय सांगो । गुणी गुंतला हेत कोणासी सांगों ॥ बहू साल भेटावया प्राण फूटे । उदासीन हा काळ कोठे न कंठे ॥ ४ ॥ कृपाळू-पणे भेटि दे राम-राया । वियोगे तुझ्या सर्व व्याकूळ काया ॥ जनांमाजि.लौकीक हा ही न सूटे | उदासीन हा काळ कोठे न कंठे ||५|| अहा रे विधी त्वा असे काय केले । पराधीनता पाप माझें उदेले ॥ बहूता-मध्ये तूकता तूक तूटे | उदासीन हा काळ कोठें न कंठे ॥६॥ समार्या मनी सांडि माझी नसावी । सदा सर्वदां भक्तचिता असावी ।। घडेना तुझा योग हा प्राप्त कोठे । उदासीन हा काळ कोठे न कंठे ॥ ७ ॥ अखंडीत हे सांग सेवा घडावी। न होता तुझी भोट काया पडावी ।। दिसंदीस आयुष्य हे व्यर्थ लोटे । उदासीन हा काळ कोठे न कंठे ॥८॥ भजों काय सर्वा परी हीन देवा । करूं काय रे सर्व माझा चि ठेवा ।। म्हणों काय मी कर्मरेखा न लोटे। उदासीन हा काळ कोठे न कंठे ॥९॥ म्हणे दास मी वाट पाहे दयाळा । सदा सर्वदा भक्त-पाळा भुपाळा ।। पहावे तुला हे जिवी आर्त मोठे । उदासीन हा काळ कोठे न कंठे ॥१०॥ तुझा भाट मी वर्णितो रामराया। सदा सर्वदा गाय ब्रीदे-सवाया। महाराज दे अंगिचे वस्त्र आतां । बहू जीर्ण झाली देहे-बुद्धि-कथा ॥११॥ आरती. नाना देवी देव एक वीराजे । नाना-नाटक-लीला-सुंदर रूप साजे॥ तीर्थी क्षेत्री अभिनव गति माजे । अगाध महिमा पिंडी ब्रह्मांडी गाजे ॥ जयदेव जयदेव जय आत्मारामा । निगमागम शोधीतां न कळे गुण-सीमा ॥१॥ बहु रूपी बहुगुणी बहुता काळाचा । हरिहरब्रह्मादीक देव सकळांचा ॥ पुगानुयूी आत्माराम आमुचा । दास म्हणे महिमा न बोलवे वाचा ।। || जय देव जय० ॥२॥ १५. मीर-पाणी. (अश्रु ).