पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करुणाटके. (१३५) मनी कामना कल्पना ते नसावी । कुबुद्धी कुडी वासना नीरसावी || न संशयो तोडि संसार चिंता । रघूनायका मागणे हेंचि आतां ॥ ७ ॥ "समर्था-पुढे काय मागं कळेना । दुराशा मनी बैसली हे ढळेना ।। पुढे संशयो नारसी सर्व चिंता । रघुनायका मागणे हे चि आतां ।। ८ ।। ब्रिदा कारणे दीन हाती धरावें । म्हणे दास भक्तांसि रे उद्धरावें ।। . तुटे ब्रीद आह्मासि सोडोनि जाता । रघुनायका मागणे हेचि आतां ॥ ९॥ अष्टक ५. युक्ति नाही बुद्धि नाहीं । विद्या नाहीं विवकिता ॥ नेणता भक्त मी तूझा । बुद्धि दे रघुनायका ॥ १ ॥ बोलतां चालतां येना । कार्य-भाग कळे चि ना ॥ बहूत पीडिलों लोकी । बुद्धि दे रघुनायका ।। ९ ।। तुझा मी टोणपा. झालो । कष्टलों बहुतां परी ॥ सौख्य ते पाहतां नाहीं । बुद्धि दे रघुनायका ।। ३ ।। नेटके लिहिता येना । वाचितां चुकतो सदा ।। अर्थ तो सांगता येना । बुद्धि दे रघुनायका ॥ ४ ॥ प्रसंग वेळ तर्केना । सचेना दीर्घ सूचना ।। मैत्रिकी राखिता येना ।। बुन्दि दे रघुनायका ॥५॥ संसार नेटका नाहीं । उद्वेगो वाटतो जिवीं ।। परमायूँ कळेना की । बुद्धि दे रघुनायका ।। ६ ।। उदास वाटते जावी । आतां जावे कुणीकडे ।। तूं भक्त-वत्सला रामा । बद्धि दे रघुनायका ।। ७ ॥ काया-वाचा-मनो-भावें । तुझा मी म्हणवीतसे ॥ हे लाज तुजला माझी । बुद्धि दे रघुनायका ।। ८॥ सोडवील्या देव-कोटी । भूभार फेडिला बळे । भक्तांसि आश्रयो मोठा । बुद्धि दे रघुनायका ।। ९ ॥ भक्त ऊदंड तुम्हाला । आमाला कोण पूसते ।। ब्रीद हे राखणे आधी । बद्धि दे रघुनायका ।। १०॥ आशा हे लागली मोठी । दयाळू बा दया करी ।। आणखी नलगे काही । बुद्धि दे रघुनायका ।। ११ ॥ उदंड ऐकिली कीर्ति । पतीत-पावना प्रभो ॥ मी एक रंक दुर्बुद्धि । बुद्धि दे रघुनायका ।। १२॥ १४. रंक-भिकारो.