पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१३४) श्रीरामदासकृत कितीकी देहे त्यागिले तूज लागी । पुढें नहालों संगतीचा विभागी ।। देहे दुःख होतां चि वेगे पळालो । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ।। ६ ।। किती योग-मूर्ति किती पुण्यमूर्ती । किती धर्मसंस्थापना अन्न-शांती ॥ परस्तावलों कावलों तप्त झालो । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ।। ७ ॥ सदा सर्वदां राम सोडोनि कामी। समर्था तुझे दास आम्ही निकामी ।। बह स्वार्य बुद्धी नुरे कष्टवालो । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ।। ८ ॥ अष्टक ३. नसे भक्ति ना ज्ञान ना ध्यान कांहीं । नसे प्रेम हे राम-विश्राम नाहीं ।। असा दीन अज्ञान मी दास तूझा । समर्था जनी घेतला भार माझा ।। १ ।। रघनायका जन्म-जन्मांतरीचा । अहंभाव छेदोनि टाकी दिनाचा ।। जनीं बोलती दास या राघवाचा । परी अंतरी लेश नाही तयाचा ॥ २ ॥ रघुनायका दीन हाती धरावे । अहंभाव छेदोनियां उद्धरोवे ।। अग्रणी तयालाार्ग गूणी करावें । समथे भवसागरी ऊतरावे ॥ ३ ॥ किती भार घालू रघूनायकाला । मज कारणे शीण होतील त्याला ।। दिना-नाय हा संकटी घाव घाली । तयाचेनि योगें सर्व काया निवाली ॥ ४ ॥ मन कूवसा राम कैवल्यदाता । तयाचेनि हे फीटली सर्व चिता ।। समर्था तया काय उत्तीर्ण व्हावें । सदां हां नाम वाचे वदावें ॥ ५ ॥ दिनाचे उणे दीसतां लाज कोणा । जगी दास दीसे तुझा दैन्य-वाणा ।। शिरी स्वामि तूं राम पूर्ण-प्रतापी | तुझा दास पाहीं सदा शीघ्र कोपी ॥ ६ ॥ अष्टक ४. उदासीन हे वृत्ति जीवीं धरावी । अती आदरे सर्व सेवा करावी ।। सदा प्रीति नामी तुझे गण गातां । रघूनायका मागणे होच आतां ॥ १ ॥ तुझे रूप हे लोचनी म्यां पहावे | तुझे गण गातां मनाशी रहावे ।। उठो आवडी भक्ति-पये चि जातां । रघुनायका मागणे होच आतां ।। २ ।। मनी वासना भक्ति तूझी करावी । कृपाळू-पणे राघवे पूरवावी ।। वसावे मदीयांतरीं नाम घेतां । रघुनायका मागणे हेचि आतां ॥ ३ ॥ सदा सर्वदा योग तूझा घडावा । तुझे कारणी देह माझा पडावा । उपेक्षं नको गणवंता अनंता । रघुनायका मागणे होचे आतां ।। ४ ।।। भवे तापलों प्रीति-छाया करावी । कृपासागरा सर्व चिता हरावी ॥ मला संकटी सोडवावे समर्था । रघुनायका मागणे हेचि आतां ॥ ५ ॥ नको द्रव्य दारा नको वेरझारा । नको मानसी ज्ञान-गवे फुगारा॥ सगणी मला लावि रे भक्ति-पंथा। रघूनायका मागणे हचि आतां ।। ६ ।।