पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करुणाष्टके. स्वजन-जन-धनाचा कोण संतोष आहे । रघुपति-विण आतां चित्त कोठे न राहे ।। जिवलग जिव घेती प्रेत सांडोनि देती। विषय सकळ नेती मागुता जन्म देती ।। ११ ।। सकळ-जन भवाचे आथिले वैभवाचे । जिवलग मज केचे चालती हे च साचें ।। विलग विषम काळी सांडिती सर्व माळी । रघुविर सुख-दाता सोडवी अंतकाळी ।। १२ ।। सुख सुख ह्मणतां ते दुःख ठाकानि आले । भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले ॥ भ्रमित मन कळेना हीत ते आकळेना । परम कठिण देहो देह-बुद्धी गळेना ॥ १३ ॥ उपरति मज रामी जाहली पूर्ण-कामी। सकळ-जन-विरामी राम-विश्राम-धामी ॥ घाड घडि मन आतां राम-रूपी भरावें । रघुकुळटिळका रे आपुलेसे करावें ॥ १४ ॥ नळचर जळ-वासी नेणती त्या जळासी । निशिदिनि तुजपाशी चूकलो गूणराशी ॥ भूमिधर-निर्गमासी वर्णवेना तयाशी । सकळ-भुवन-वासी भोट दे रामदासी ॥ १५॥ अष्टक २. असंख्यात ते भक्त होऊनि नेले। तिहीं साधनांचे बहू कष्ट केले ।। नव्हे कार्यकर्ता भमी भार झालों । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ॥१॥ बहू दीस ते तापसी तीर्थ-वासी । गिरी-कंदरी भेटि नाही जनासी ॥ स्थिती ऐकतां थोर विस्मीत झालो। तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ॥२॥ सदा प्रेमळासी तया भेटलासी | तुझ्या दशेने स्पर्शने पुण्यराशी ॥ अहंता-मदें शब्द-ज्ञाने बुडालों । तुझा दास मी व्यर्थ जन्मास भालो ।। ३ ।। तुझ्या प्रीतिचे दास जन्मास आले । असंख्यात ते कीर्ति बोलोनि गेले ।। बहू धारणा थोर चक्कीत झालो । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ॥४॥ बहूसाल देवालये हॉटकाची । रसाळा कळा लाघवे नाटकाची ।। पुजा देखतां जड जीवीं गळालो । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ॥ ५ ॥ १०. रघुकुळ-टिळक-रघु-वंश-श्रेष्ट १३. भुमिधर=शेष. १२. निगम वेद. १३. हाउक-सोने.