पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१३२) श्रीरामदासकृत दुरित दुरि रहावे म्यां स्वरूपी भरावें ॥ ३ ॥ तन-मन-धन माझे राघवा! रूप तूझें । तुजविण मज वाटे सर्व संसार बोझें ।। प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी । अचल भजन लीला लागली आस तूझी ॥४॥ चपल-पण मनाचे मोडितां मोडवेना । सकळ-स्वजन-माया तोडितां तोडवेना ।। घडि घडि विघडे हा निश्चयो अंतरीचा । ह्मणवुनि करुणा हे बोलतो दीन वाचा ।। ५ ॥ जळत हृदय माझें जन्म कोटयानु कोटी । मजवरि करुणेचा राघवा पर लोटी।। तळमळ निववी रे राम कारुण्य-सिंधू । बैडरिपु-कुळ माझे तोडिं याचा समंधू ॥ ६ ॥ तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी । शिणत शिणत पोटी पाहिली वाट तूझी ।। झडकरि झड घाली धांव पंचाननारे । तुजविण मज नेसी जंबुकी वासना रे ॥ ७ ॥ सबळ जनक माझा राम लावण्य-पेटी । ह्मणवुनि मज पोटी लागली आस मोठी ।। दिवस गणित बोटी प्राण ठेवोनि कंठी । अवचट मन भेटी होत घालीन मीठी ॥ ८ ॥ नननि-जनक-माया लेकरूं काय जाणे । पय न लगत मूखे हाणितां वत्स नेणे । जलधर-कण-आशा लागली चातकासी । हिमकर अवलोकी पक्षिया भूमि-वासी ॥ ९ ॥ तुजविण मन तैसे जाहले रामराया । विलग विषम काळी सांडिती सर्व माया ।। सकळ-जन-सखा तूं स्वामि आणीक नाहीं। विषय वमनं जैसे त्यागिले सर्व काही ॥१०॥ २. दुरित-पाप. ३. षड्रिप-काम, कोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार. १. पंचानन=सिंह. ५.जबको कोल्ही. ६. जलधर मघे. ७. हिमकर-चंद्र.८. पक्षि चकोरपक्षी. ९ बमन ओक.