पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करुणाष्टके. (१३१) श्यामवर्ण शुभ्र होती । त्याला लातारा म्हणती ।। सा० ॥ ४ ॥ साठीत बुद्धि नाठी । हाती घेउनी काठी ।। वसवसुनी लागे पाठी । त्याला हांसती कारटी ।। सा० ॥ ५ ॥ सत्तरीची हे रचना | उठतां बैसवेना ।। बैसतां उठवेना | दिसतसे दैन्यवाणा।। सा० ॥ ६ ॥ चार विसा मिळुनि ऐशी । मग तो झाला अपेशी ।। जिव करी कासाविशी । जिवनावीण मासोळी नैशी || सा० ॥ ७ ॥ वर्षे झाली नव्वद । बोलवेना एक शब्द ।। अस्तुरी दारा प्रसिद्ध । देवा तोडिं यांचा संबंध ।। सा०11८॥ शतमान पुरुष झाला । झाला परी वायां गेला ।। रामदास याच्या बोला । वेगी सावध जाहला ।। सावधान सावधान । वाचे स्मरा नारायण ।। ९॥ रामदासकृत-अष्टके. करुणाष्टक. अनुदिनि अनुतापे तापलो रामराया । परम दिन दयाळा नारसी मोह-माया ॥ अचपळ मन माझे नावरे आंवरीतां । तुजविण शिण होतो धांवरे धांव आतां ॥ १ ॥ भजन रहित रामा सर्व ही जन्म गेला । स्वजन-जन-धनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ॥ रघुपति मति माझी आपुलीशी करावी । सकळ त्यजुनि भावे कांस तूझी धरावी ।। २ ॥ विषय-जनित सूखे सूख होणार नाहीं । तुजविण रघुनाथा ओखटे सर्व काही ॥ रघुकुळ टिळकारे हीत माझे करावें। १. रामदासकृत श्लोकबद्ध-अष्टकांचा उल्लेख पुढील लेखांत महिपतीने केला आहे: गद्य-पद्य बोलिले फार । लोक अष्टके प्रकार ॥ हष्ण चरित्रं गाइलों सार । प्रेमासि पार असेना || १७ ॥ संत विजय-अ० २२षा.