पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१३०) श्रीरामदासकृत पया माजि कृष्णातिरी रामराया । घडे राहणे स्नानसंध्या कराया ।। सिता राहिली शीरटें गांव जेथें । रघुराज तो पश्चमेचे नि पंथें ॥ २ ॥ नप ध्यान पूजा करी रामराजा । तयाचे परी वीर सौमित्र वोजा ।। स्मरेना देहीं चित्त ध्यानस्थ झाले । अकस्मात ते तोय अद्भत आले।।३।। बळे चालिला ओघ नेटें भडाडां । नभी धांवती लोट लाटा धडाडां ।। नदी चालली राम ध्यानस्थ जेथे । बळे विक्रम पावला भीम तेथे ॥ ४ ॥ उभा राहिला भीमरूपी स्वभावे । बळें तुंब तो तुंबिला दोन गांवे ।। नदी एक वीभागली दोन्हि बाहें । ह्मणोनी तया नांव हे ऊर्णबाहे ||५|| सुखे लोटती देखतां रामलिंगा । बळे चालिली भोवती कृष्ण गंगा ॥ परी पाहतां भीम तेथे दिसेना । उदासीन हे चित्त कोठे वसेना ।। ६ ।। हनुमंत पहावयालागि आलो । दिसेना सखा थोर विस्मीत झालो ।। तयावीण देवालय ते उदासे । जळांतून बोभाइले रामदासे ।। ७ ।। मनांतील जाणोनि केला कुडावा | दिले भेटिचा जाहला थोर थावा ।। बळे हांक देतां चि तैसा गडाडी । महामेघ जैसा गभीरू घडाडी ।। ८॥ रघुराज वैकंठ-धामासि गेले । तधों मारुती दास हे नीरवीले ॥ रघूनाथ ऊपासकाला प्रसंगे । सख्या मारुती पाव रे लागवेगें ॥ ९ ॥ प्रभूचे महा वाक्य त्वां साच केले । ह्मणे दास हे प्रत्यया सत्य आलें ।। जनामाजि हे सांगतां पूरवेना । अवस्था मनी लागली हे सरेनी ॥१०॥ इतिश्री भीमरूपि-स्तोत्र संपूर्ण ॥ १३ ॥ त्रयोदश स्तोत्रे समाप्त. पद रामदासकृत सावधान सावधान | वाचे स्मरा नारायण || ध्रु० ॥ दहा वर्षे बाळपण । वीस वर्षे तारुण्य ॥ अंगी चढे मदन । तेव्हां कैचे साधन || साब० ॥१॥ तिसांची आली भर्ती । दारापुत्रां लागी प्रीति ।। तेथून उपजे भ्रांती । तेव्हां कैची स्वरूप प्राप्ती ।। सा० ॥ २ ॥ चाळीस वर्षे झाली । डोळां चाळशी आली ॥ - नेत्रांस भुली पडली । जवळ असतां दिसेना ॥ सा० ॥ ३ ॥ पन्नास वर्षे झाली । हलति दंताच्या पंगती || ३२ संत विजयांत हे स्तोत्र महिपतीने ऊर्ग बाह मारुतीचे म्हणून दिले आहे.