पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भीमरूपि-स्तोत्रं. (१२९ चळवितां चळवी चळवेना | छळवितां छळवी छळवना ॥ जळवितां जळवी जळवेना । टळवितां टळवी टळवेना ॥ १५ ॥ घसरितां घसरी घसरेना । विसरितां विसरी विसरेना ॥ मरवितां मरवी मरवेना । हरवितां हरवी हरवेना ॥ १६ ॥ उलाथतां उलथी उलथेना । कलथितां कलथी करूथेना ।। उडवितां उडवी उडवेना | बुडवितां बुडवी बुडवेना ॥ १७ ॥ बुकलितो बुकली बुकलेना । धुमसितां धुमसी धुमसेना ॥ धरवितां धरवी धरवेना | सरवितां सरवी सरवेना ॥ १८ ॥ झडपितां झडपी झडपेना । दडपिता दडपी दडपेना ॥ तटविता तटवी तटवेना । फटवितां फटवी फटवेना ॥ १९॥ वळवितां वळवी बळवेना । पळवितां पळवी पळवेना ।। ढळवितां ढळवी वळवेना । लळविता लळवी लळलेना ॥ २०॥ घुराकतां घुरकी घुरकावी । थरकितां थरकी थरकावी ॥ भरकितां भरकी भरकावी । झरकितां झरकी झरकावी ॥ २१ ॥ परम दास हटी हटवादी। लगटला उतटी तटवादी। शिकवितां शिकवी शिकलावी । दपटितां दपटून दटावी ॥ २२ ॥ इतिश्री भीमरूपिस्तोत्र संपूर्ण ॥ ११॥ १२ भिम भयानक तो शिक लावी । भडकला सकळां भडकावी । चरतरू वरता तडकावी | बळकटां सकळां धडकावी ॥ १ ॥ सकळ ते रजनी-चर-भारे । सकट बांधत पुच्छ उभारे ॥ रडत बोलति वीर च सारे । नदिसतां चि बळे भुभुकारे ॥ २॥ जळतसे त्रिकुटाचळ लंका। धरितसे रजनी-चर शंका || उमजती उमजेवर घाला । अवचितां बुडवी सकळांला ॥३॥ कठिण मार विरांस न साहे | रुधिर-पूर महीवरि वाहे ॥ बहुत भूत भुतावळि आली । रणभुमीवरि येउनि घाली ॥४॥ अमर ते म्हणती विर आला । नवल हे पुरलें सकळाला || उदित काळ बरा दिसताहे । विधि-विधान विधी मग पाहे ॥ ५॥ इतिश्रीभीमरूपि-स्तोत्र संपूर्ण ॥ १२ ॥ बळे सर्व संहारिले रावणाला | दिले अक्षयी राज्य बीभीषणाला ॥ रघूनायके देव ते मुक्त केले | अयोध्यापुरा जावया सिद्ध झाले ॥१॥