पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२८) श्रीरामदासकृत सिमा सांडिली भीमराजे विशाळें । बळे रोटिले दैत्य कृतांत-काळे ।। गजामस्तकी केसरीचा चपेटा । महावीर तैसा विभांडी त्रिकूटा ॥ ६ ॥ इतिश्री भीमरूपि-स्तोत्र संपूर्ण ।। १० ॥ नमन गा तुज हे भिमराया। निज मती मज दे मज गाया ।। तडकितां तडकी तडकाया । भडकितां भडकी भडकाया ।। १ ।। हरुषला हर हा वरदानीं । प्रगटला नटला मज मानी ।। वदविता वदनों वदवीतो। पुरवितो सदनी पदवीतो ॥ २॥ अवचिर्ता चढला गडलंका । पळभरी न धरी मनिं शंका ।। तडकितां तडकी तडकीतो । भडकिता भडकी भडकीतो ।। ३ ।। . खवळले रजनीचरभारे । भडकितां तड़के भडमारे ॥ अवचितां गरजे भुभुकारें । रगडिजे मग कां दळ सारे ॥ ॥ कितियका खरडी खुरडीतो । कितियका नरडी मुरडीतो ।। कितियका चिरडी चिरडीतो । कितियका अरडी दरडीतो ॥ ५॥ महाबळी रजनीचर आले | भिम भयानकसे चि मिळाले । रपटितां रपटी रपटेना । अपटितां अपटी अपटेना ।। ६ ।। खिजवितां खिजवी खिजवेना । झिझविता झिजवी झिजवेना।। रिझवितां रिझवी रिझवेना । विझवितां विझवी विझवेना।। ७ ।। झिडकितां झिडकी झिडकेना । तड़कितां तड़की तडकेना ।। फडकितां फडकी फडकेना। कडकितां कड़की कड़केना ॥८॥ दपटितां दपटी दपटेना । झपटितां झपटी झपटेना ।। लपदिता लपटी लपटेना | चपटितां चपटी चपटेना ॥ ९ ॥ दवडितांदवडी दवडेना । घडवितां घडवी घडवेना ।। बडवितां बड़वी बडबेना | रडवितां रडवी रडवेना ।। १० ।। कळवितां कळवी कळवेना । खवळितां खवळी खवळेना || जवळितां जवळी जवळेना । मवळितां मवळी मवळेना ॥ ११॥ चढवितां चढवी चढवेना। झडवितां झडवी झडवेना ।। तडवितां तडवी तडवेना । गडवितां गडवी गडवेना ।। १२।। तगटितां तगटी तगटेना । झगटितां झगटी झगटेना ।। लगटितां लगटी लगटेना । झकाटतां झकटी झकटेना ।। १३ ।। टणकिसां टणकी टणकेना । ठणकितां ठणकी ठणकना ।। दणागतां दणगी दणगेना । फुणगितां फुणगी फुणगेना ॥ १४ ॥