पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भीमरूपि-स्तोत्रं. (१२७) फणिवर कैमठाचे पृष्ठिशी आंग घाली । तगटित पवनाची झेप लंकेसि गेली ॥ ३ ॥ थरकत धरणी हे हाणतां वन-पच्छे । रगडित रणरंगी राक्षसे तृण तुच्छे । सहज रिपु दळाचा थोर संहार केला । अवघड गड लका शीघ्र नाळन आला ।।४।। सहन करतळे जो मेरु-मंदार पाडी । दशवदन रिपू हे कोण कीती बराडी ।। अगणित गणवेना शक्ति काळासि हारी । पवन-तनुज पहा पूर्ण रुद्रावतारी ॥ ५ ॥ इतिश्री भीमरूपिस्तोत्र संपूर्ण ।। ८ ।। लघूशी परी मर्ति हे हाटकाची । करावी तथा मारुता-नाटकाची ।। असावी सदां ताइता माजि दंडी | समारंगणी पाठ दीजे उदंडी ॥१॥ ठसा हेमधातू वरी बायु-सूतू । तथा ताइताचे परी रौप्य-धातू ।। तयाची पुजा मंदवारी करावी । बरी आवडी आत पोटी धरावी ।। २ ।। स्वधामासि जातां प्रभू रामराजा । हनूमंत तो ठेविला या चि काजा ।। सदा सर्वदा रामदासासि पावे । खळी गांजितां ध्यान सोडून धांवे ।। ३ ।। इतिश्री भीमरूपि-स्तोत्र संपूर्ण ॥ ९॥ चपळ ठाण विराजतसे बरें । परम संदर तें रुप साजिरे ।। धगधगीत बरी उटि सिंदुरे । निकट दास कपी, विर हे खरें ।। १ ।। कपी वीर नेठी उडे चारि कोटी । गिरी द्रोण दाटी तळहाते उपाटी ।। झपेटी लपेटी करी पुँच्छवेटी । त्रिकूटाचळी ऊठवा वीर कोटी ॥ २ ॥ रघुविरा समिरात्मज भेटला | हरिजना भजनांकुर फूटला ।। कपिकुळे सकळे मिनली बळे । रिपदळे विकळे वडवानळे ।। ३ ।। कपीवीर तो लीन तल्लीन झाला । प्रसंगे चि पाहोनि सन्मख आला ।। हममंत हे पावला नाम तेथें । महीमंडळी चालिले सर्व तेथे ॥ ४ ॥ नव्हे सौख्य हा भीम पूर्ण प्रतापी । देहो आचळातुल्य हा काळरूपी ।। पुढे देखतां दैत्य-कूळे दरारा । भुते कांपती नाम घेतां थरारां ॥ ५ ॥ २७ फणिवर शेष सर्प. २८ कमठ-कर्म (कांसघ ). २१ हाटक-सोनें. ३० पुच्छषेटी, अच्छाचा वेढा.. ३१ समीर-बायु.