पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२६) श्रीरामदासकृत रामदूत वात-सूत लोटि लाटि लाठितो ।। ऊठ आमुचे समस्त कूट कूट कूटितो। धूट धूट दैत्य त्यास लूट लूट लटितो ॥ १६ ॥ समस्त दैत्य आळितो बळे त्रिकूट जाळितो । पुरांत गोपुरे बरी निशाचरांसि वाळितो ।। उदंड अग्मि लाविला बहू बेळे उठावला। कडाडिला तडाडिला भडाडिला धडाडिला ।। १७॥ उदंड जाळिली घरे कितेक भार खेरें । किलाल धांवती भरे सुरांस वाटले बरें ।। उदंड दैत्य धोवडी तयांत पुच्छ भोवडी । कडाकडी खडाखडी गडागडी घडाघडी ।। १८ ॥ बळे चपेट मारिला उदंड दैत्य हारिला । तरारिला थरारिला भयंकरू भरारिला ।। गद्गदी तनू वितंड सागरी सरारिला । जानकीस भेटला प्रभूकडे सरारिला ।। १९॥ काळसे विशाळ दैत्य त्यांत एकला भरे। थोर धाक एक हाक काळ-चक वावरे ।। शक्ति शोधिली बळे चि भव्य देखिले धुरे । वानरांसहीत रामदास भेटला त्वरे ।। २०॥ इतिश्री भीमरूपि-स्तोत्र संपूर्ण ।। ७ ।। भुवन-दहन-काळी काळ विकाळ जैसा । सकळ गिळित ऊभा भासला भीम तैसा ।। दुपट कर्पित झोके झोकिली मेदिनी हे। तळवट धरि धाके धोकली नाउं पाहे ॥ १ ॥ गिरिवरुनि उडाला तो गिरी गुप्त झाला । घसरत दश गांवे भूमिके माजि गेला ॥ उडति झडझडाटें वृक्ष हे नेट-पाटें । पडति कडकडाटे अंग वातें धुदाटे ॥ २ ॥ थरथरित थरारी वज लांगूल जेव्हां । गरगरित गरारी सप्त पाताळ तेव्हां ।। २६ गांव-योजन.