पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२४) श्रीरामदासकृत शिरोणिचे किराण सज्य त्रीकुटास पावला ।। वात जातसे तसाचि स्थूळ देह राहिला वावरोनि वीवरोनि तो त्रिकूट पाहिला ॥ १ ॥ हीन देव दीन रूप देखतांचि पावला गड्गडीत घडूघडीत कडकडीत कोपला ।। लाटि कूटि पाडि फोडि झोडि झोलि झोडला दैत्य तो येक हाक सर्व गर्व मोडिला ॥२॥ सानरूप पुच्छ तें स्वरूप गुप्त बैसला कपीकेत शोध घेत त्रीकूटांत बैसला ॥. गड्गडी दिसेचि ना बुझेल कोण कैसला वळावळी चळाचळी विशाळ ज्वाळ जैसला ॥ ३ ॥ काळदंडसे प्रचंड ते वितंड जातसे भारभार राजभार पुच्छमार होतसे ।। पाडिले पछाडिले रुधीर-पूर व्हातसे दैत्य बोलती बळे पळोन काय घ्यातसे ॥४॥ कीळ-कूट ते त्रिकूट धूट धूट ऊठिले दाट थाट लाट लाट कूट कूट कूटिले । घोर मार ते सुमार लूट लूट लूटिले चिर्डिले चि घर्डिले चि फूट फूट फूटले ॥ ५ ॥ दाट थाट आट घाट ते कपाट घातलें सर्व रोध ते निरोध थोर दुःख पावले ॥ सैन्य कट्ट त्यास कह कर्करून बांधिले थोर घात त्यास पात चर्फडीत चेंदले ॥६॥ वज पुच्छ त्यास तुच्छ मानिले निशाचरी सर्व ही खणाखणाट ऊठिले घरोघरी फुटे चि ना तुटे चि ना समस्त भागले करी लटलटीत कांपती बहूत धाक अंतरीं ॥ ७॥ थोर थोर दूर दूर दाट दाट दाटले कोट मस्त तंग बस्त थाट थाट थाटले ॥ मंदिरी घरोघरी अचाट पुच्छ वाटले १७. शिराणीचे किरण आवडीचे उडाण, १८ तोफ बालक, १९ रुधिर रक्त. २०. काळकूट विष, २१. निशाचर राक्षस.