पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भीमरूपि-स्तोत्रं. (१२३) तजविण मज पाहे पाहतां कोण आहे ह्मणउनि मन माझे रे तुझी वाट पाहे ॥ मज तुज निरवीले पाहिले आठवीले सकळिक निज-दासालागि सांभाळवीले ॥ ५ ॥ उचित हित करावे उद्धरावे धरावें अनहित न करावे त्वां जनी येश घ्यावे || अघटित घडवावे सेवका सोडवावें हरि-भजन घडावे दुःख ते वीघडावें ।। ६ ।। प्रभुवर विर-राया जाहली दृढ काया पर-दळ निवटाया दैत्य-कूळे कुटाया ।। गिरिवर उगटाया रम्य- वर्षे नटाया तुजचि अलगटाया ठेविले मुख्य ठाया ।। ७ ।। बहुत सबळ सांठा मागतो अल्प वांटा न करित हित कांटा थोर होईल ताठा ।। कृपण-पण नसावें भव्य लोकी दिसावे अनुदिन करुणेचे चिन्ह पोटी वसावें ॥८॥ जळधर करुणेचा अंतरा माजि राहे . तरि तुज करूणा हे कां न ये सांग पां हे ।। कठिण हृदय झाले काय कारुण्य गेले न पवसि मज कां रे म्यां तुझे काय केलें ॥ ९ ॥ वडिलपण करावे सेवका सांवरावे अनहित न करावे तर्त हाती धरावे ।। निपट चि हटवादे प्रार्थिला शब्द भेदें कपि घन करुणेचा वोळला राम- वधे ।। १० ।। बहुत चि करुणा या लोटली देवराया। सहज चि कपि-केते जाहली दृढ काया ।।। परम सुख विलासे सर्वदां सानुदासे पवन-तनुज तोपें वंदिले सावकाशे ॥ ११ ॥ ॥ इति श्री भीमरूपि-स्तोत्र संपूर्ण ॥ ६ ॥ June रुद्र हा समुद्र देखता क्षणी उठावला: १६. कपिकेत (कपिकेतु ) वानरश्रेष्ठ.