पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२२) श्रीरामदासकृत पाडितो राक्षस नेटें । आपटी महिमंडळा ॥ सौमित्र-प्राण-दाताची | कपी-कुळांत मंडणू ।। १८ ।। दंडिली पाताळ-शक्ती । अही मही निर्दाळिले ।। सोडिले रामचंद्राला | कीर्ति हे भुवनत्रयों ॥ १९॥ विख्यात ब्रोद तें कैसे । मोक्ष-दाता चिरंजिवी ।। कल्याण त्याचेनि नामें । भूत पिशाच कांपती ।। २० ।। सर्प वृश्चिक पश्वादी | विष शीत निवारण ।। आवडी स्मरतां भावे । काळ कृतांत धाकतो ॥ २१ ।। संकटे बंधने बाधा | दु:ख दारिद्र्य-नाशका ।। ब्रह्म-ग्रह-पिडा-व्याधी । ब्रह्म हत्यादि पातके ।। २२ ।। पुर्वितो सकळ ही आशा । भक्त-काम-कल्पतरू ।। त्रिकाळी पठतां स्तोत्र । इच्छिले पावसी जनीं ।। २३ ।। परंतु पाहिजे भक्ती । संघी कांहीं धरूं नका ॥ रामदासा साहाकारी | सांभाळी तो परोपरी ॥ २४ ॥ इति श्री हनुमंत स्तोत्र संपूर्ण ॥ ५ ॥ कपि विर उठला तो वेग अद्भत केला त्रिभुवन-जन-लोकी कीर्तिचा घोष केला ।। रघुपति उपकारें दाटले थोर भावे परम धिर उदार रक्षिले सौख्य-कारें ।। १ ।। सबळ दळ मिळालें युद्ध ऊदंड झाले कपि-कटक निमाले पाहतां येश गेले ।। पर-दळ-शर-घाते कोटिच्या कोटि प्रेते अभिनव रण-पाते दुःख बीभीषणाते ।। २ ।। कपि-रिस-घनदाटी जाहली थोर आटी म्हणउनि जग-जेठी धांवणे चार कोटी ।। मृत्युविरल ठेविले मोकळे सिद्ध झाले सकळ जन निवाले धन्य सामर्थ्य चाले ॥ ३ ।। बहु प्रिय रघुनाथा मुख्य तूं प्राण-नाथा उठवि मज अनाथा दर सांडूनि वेथा ।। झडकार भिमराया तूं करी दृढ काया रघुविर-भजना या लाग वेगे चि जाया ॥४॥