पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भीमरूपि-स्तोत्र (१२१) वजदेही सौख्यकारी । भीमरूपा प्रभंजना ।। पंचभूतां मूळ माया । तूंचि कर्ता सकळ ही ॥ ३ ॥ स्थितीरूपे तूंचि विष्णू । संहारका पशुपते ।। परात्परा स्वयंज्योती । नामरूपा गुणातिता || ४ ॥ सांगतां वर्णितां येना । वेदशास्त्रा पेड ठका ॥ शेष तो शिणला भारी । 'नेति नेति' परा श्रुती ।। ५ ॥ धन्य अवतार कैसा हा । भक्तां लागि परोपरी ॥ रामकाजी उतावळा | भक्तां रक्षक सारथी ॥६॥ चारितो दर्घटे मोठी । संकटी धांवतो त्वरे ।। दयाळ हा पूर्ण दाता । नाम घेतां च पावतो ।। ७ ॥ धीर वीर कपी मोठा । मागे नव्हे चि सर्वथा ।। उड्डाण अद्भूत ज्याचें । लंधिले समुद्राजळा ॥८॥ देउनी लिखिता हातीं । नमस्कारी सितावरा ।। वाचितां सौमित्र अंगे । राम सुखे सुखावला ॥ ९ ॥ गर्जती स्वानंद मेळी ! ब्रह्मानंदे सकळ ही। अपार महिमा मोठा । ब्रह्मादिकांसी नाकळे ॥१०॥ अद्भत पुच्छ ते कैसे । भोवंडी नभ-पोकळी ।। फांकलें तेज तें भारी । झांकिले सूर्य-मंडळा ॥ ११ ॥ देखतां रूप पैं ज्याचे । उडाण अद्भूत शोभले ॥ ध्वजांग उर्ध्व तो बाहू । वामहस्त कटावरी ।। १२ ।। कसिली हेम-कासोटी । घंटा किंकिाण भोवत्या ।। मेखळे जडली मुक्ते । दिव्य रत्ने परोपरी ॥ १३ ॥ मायां मुगुट तो कैसा ! कोटि चंद्रार्क लोपले ॥ कुंडले दिव्य ती कानी । मुक्त-माला विराजते ॥ १४ ॥ केशर रेखिले भाळी । मुख सुहास्य चांगले ॥ मुद्रिका शोभती बोटीं । कंकणे कर मंडित ।। १५ ।। चरणींचे वाजती अंहूँ । पदीं तोडर गर्नती ।। कैवारी नाय दीनाचा । स्वामि कैवल्य दायक ।। १६ ।। स्मरतां पाविजे मुक्ती । जन्म-मृत्यासि वारितो॥ कांपती दैत्य तेजासी । भुभुःकार देतां बळें ॥ १७ ॥ १०. लिखित पत्र. ११. हेम-सोने. १२. मेखला कडदोरा. १३. अंदु सांखळ्या पायांतल्या. १४. तोडर-तोरड्या. १५. कैवल्य-मोक्ष.