पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२०) श्रीरामदासकृत अद्भूत वेश आवेशे । कोपला रण-कर्कशू ।। धर्म-संस्थापनेसाठी । दास तो ऊठिला बळें ।। ६ ।। इति श्री भीमरूपी स्तोत्र संपूर्ण ।। ३ ।। अंजनी-सुत प्रचंड । वज्रपुच्छ कालदंड ॥ शक्ति पाहतां वितंड । दैत्य मारिले उदंड ।। १ ।। धगधगी तसी कळा | वितंड शक्ति चंचळा ।।। चळचळीतसे लिळा । प्रचंड भीम आगळा ।। २ ।। उदंड वाढला असे । विराट धाकुटा दिसे ।। त्यजून सूर्य-मंडळा | नभांत भीम आगळा ॥ ३ ॥ ललीत बाळकी लिळा । गिळोनि सूर्य-मंडळा ।। बहुत पोळतां क्षणीं । थंकिला तो ततक्षणीं ॥ ४ ॥ धगधगीत बूबुळा । प्रत्यक्ष सूर्य-मंडळा ।।। कराळ काळ मूख तो । रिपूकुळासि दुःख तो ॥ ५ ॥ रुपे कपी अचाट हा । सुवर्ण कट्ट कासतो ।। फिरे उदास दास तो। xxx ॥ ६ ॥ झळक झळक दामिनी । वितंड काळ-कामिनी ।। तयापरी झळाझळी । ललित रोमजावळी ।। ७ ।। समस्त-प्राण-नाथ रे । करी जना सनाथ रे ।। अतळ तुळणा नसे । अतळशक्ति वीलसे ॥८॥ रुपें रसाळ बाळकू । समस्त-चित्त-चाळकू ।। कपी परंतु ईश्वरू । विशेष लाधला वरू ।। ९ ।। स्वरुद्र क्षोभल्यावरी । तयासि कोण सांवरी ।। गुणागळा परोपरी । सतेजरूप ईश्वरी ॥ १० ॥ समर्थ दास हा भला । कपी-कुळांत शोभला।। सुरारि-काळ क्षोभला। त्रिकट जिंकिला भला ।। ११ ।। इति श्री भीमरूपी स्तोत्र संपूर्ण ॥ ४ ॥ हनुमंता रामदूता । वायुपुत्रा महाबला ।। ब्रह्मचारी कपी-नाथा । विश्वंभरा जगत्पते ॥ १ ॥ दानवारी कामांतका । शोकहारी दया-निधे ।। महारुद्रा मुख्य प्राणा । मळमूर्ती पुरातना ॥ २ ॥