पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भीमरूपि-स्तोत्रं. (११९) अतूल तुलना नाहीं । मारुती वात-नंदनू ।।२। चळे ते चंचळे नटे । बाळ मोवाळ साजिरे ॥ चळवळी चळताहे | बाळ लोवाळ गोजिरे ॥ ३॥ हात की पाय की सांगों । नवं बोटे परोपरी ।। दृष्टिचे देखणे मोठे । लांगूळ लळलळीतसे ॥ ४॥ खडीखाडी दडे तैसा । पीळ पेंच परोपरी ।। उड्डाण पाहतां मोठे । झेपावे रवि-मंडळा ॥ ५ ॥ बाळाने गिळिला बाळू । स्वभावे खेळतां पहा ॥ आरक्त पीत वाटोळे । देखिले धरणीवरी ॥६॥ पूर्वेसि देखतां तेथें । उडालें पावले बळे ॥ पाहिले देखिले हातीं । गौळिले जाळिले बहू ॥ ७ ॥ थुकोनी टाकितां तेथें । युद्ध जाले परोपरी ॥ उपरी ताडिला तेणें । एक नाम चि पावला ॥ ८ ॥ हा गिरी तो गिरी पाहे । गुप्त राहे तरूवरी ॥ मागुता प्रगटे धांवे । झेपावे गगनोदरी ।। ९ ॥ पळ ही राहिना कोठे । बळे ची घालितो झडा ।। कडाडां मोडती झाडें । वाडवाडे उलंडती ॥ १० ॥ पवना सारिखा धांबे । वावरे विवरे बहू ।।। अपूर्व बाळ-लीला हे । रामदास्य करी पुढे ॥ ११ ॥ इति श्रीभीमरूपिस्तोत्र संपूर्ण ॥ २॥ कोपला रुद्र जे काळी । ते काळी पाहवे चि ना ॥ बोलणे चालणे कैचे । ब्रह्म-कल्पांत मांडला ॥ १ ॥ ब्रह्मांडाहून जो मोठा । स्थूळ उंच भयानकू ।। पुच्छ ते मुरडिले माथां । पाऊल शून्य मंडळा ॥ २ ॥ त्याहून उंच वजाचा | सव्य बाहो उभारिला ॥ त्या पुढे दुसरा कैचा । अद्भुत तुळणा नसे || ३ ॥ मार्तंड-मंडळा ऐसे । दोन्ही पिंगाक्ष ताविले ॥ कर्करा घर्डिल्या दाढा । उभे रोमांच जठिले ॥ ४ ॥ अद्भूत गर्जना केली । मेघ ची वोळले भुमी ।। तुटले गिरिचे गाभे । फुटले सिंधु आटले ॥ ५ ॥ ७. लांगूल=शेपूट. ८. मार्तड सूर्य. ९. सिंधु-समुद्र.