पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(११८) श्रीरामदासकृत लोकनाया जगनाया । प्राण-नाथा पुरातना ।। पुण्यवंता पुण्यशीला । पावना परतोषका ।। ४ ।। ध्वजांगे उचली बाहो । आवेशे लोटला पुढे ।। कालाग्नी कालरुद्राग्नी । देखतां कांपती भये ॥ ५॥ ब्रह्मांडें माईल नेणों । आवळे दंत-पंगती ।। नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा | भ्रकूटी ताटिल्या बळें ॥ ६ ॥ पुच्छ ते मुरडिले मायां । किरीटी कुंडलें वरी ।। सुवर्ण-घटि कासोटी । घंटा किंकिणि नांगरा ॥ ७ ॥ ठकारे पर्वता ऐसा । नेटका सडपातळू ।। चपलांग पाहतां मोठे । महाविद्युल्लते परी ॥ ८ ॥ कोटिच्या कोटि उड्डाणे । झेपावे उत्तरेकडे ॥ मंद्राद्री सारिखा द्रोणू । क्रोधे उत्पाटिला बळें ॥ ९॥ आणिला मागुती नेला | आला गेला मनोगती ॥ मनासी टाकिले मागे । गतीशी तुळणा नसे ॥ १० ॥ अणूपासूनि ब्रह्मांडा । एवढा होत नातसे ॥ ब्रह्मांडाभोवते वेढे । वजपुछ घालवू सके ।। ११ ॥ तयाशी तुळणा कोठे । मेरु-मंदार धाकुटे ।। तयाशी तुळणा केशी । ब्रह्मांडी पाहतां नसे ।। १२ ॥ आरक्त देखिले डोळां । गिळीले सूर्य-मंडळा ।। वाढतां वाढता वाढे । भेदिले शून्य मंडळा ।। १३ ।। भूत-प्रेत-समन्धादी । रोगव्याधी समस्त ही ।। नासती तुटती चिंता | आनंदे भीमदर्शने ।। १४ ।। हे धरा पंधरा-श्लोकी । लाभली शोभली भली ॥ दृढ देहो निसंदेहो । संख्या चंद्रकळा गुणे ॥ १५ ॥ रामदासी अग्रगण । कपिकळासि मंडण ।। रामरूप अंतरात्मा । दर्शने दोष नासती ॥ १६ ॥ इति श्री भीमरूपि स्तोत्र संपूर्ण ॥ १॥ जनीं ते अंजनी माता । जन्मली ईश्वरीतनू ॥ तनमनू तो पवनू । एक ची पाहतां दिसे ॥ १ ॥ त्रैलोक्यों पाहतां बाळें । ऐसें तो पाहतां नसे || ५. नागरा-सुंदर. ६. शून्यमंडळ आकाशमंडल.