पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीरामदासकृत भीमरूपि-स्तोत्रं. १. भीमरूपी महारुद्रा । वजहनुमान मारुती ॥ वनारी अंजनी-सूता । रामदूता प्रभंजना ॥ १ ॥ महाबली प्राणदाता | सकळां ऊठवी बळे ।। सौख्यकारी शोक-हर्ता । धूर्त वैष्णव गायका ॥२॥ दिनानाथा हरीरूपा । सुंदरा जगदंतरा ।। पाताल-देवता-हंता । भव्य-शेदूर-लेपना ।। ३ ।।। १. रामदासस्वामींनी एकंदर बारा मारुती स्थापिले असे पुढील लेखांत महिपती ह्मणतो: समर्थ आपल्या हातें निश्चिती | बारा हनमंत स्थापिले असती ।। पहिला टाकळीस असे मारुती । तो मागें संती ऐकिला || २२ ।। 11 संतविजय अ० १६ मागिले अध्यायों निरूपण । अकरा हनुमंत समर्थाने । आपुल्या हातें मूर्ति करून । केलें स्थापन तयांचें ।। • IMER त्यांची स्थानें कोणकोणतों । ती मागे श्रवण केली संती ॥... विसर पडला असेल चित्तौं । तरी सांगतों पुढती ऐका ।। ८ ।। नासिकासन्निध टाकळीस । मूर्ति स्थापिली रामदासें ।। ते पहिले चरित्र अति सुरस । ऐकिलें सावकाश सज्जनों ।। ९ ।। या विरहित कृष्णा-तोरी निश्चिती । सभथै स्थापिले अकरा मारुती ।। चांफळ-खोन्यांत दोन मूर्ति । जागृत असतो देदीप्यमान ॥ १० ।। सिंगणपुरासि एक जाण । तिसरें मसुरेंत अधिष्ठान || शहापुरांत चवथा हनुमान | आणि उमरजेंत स्थान पांचवें ।। ११ ।। साहावा मारुती निश्चित । स्थापिला बत्तीसशिराळ्यांत ।। सातवी मूर्ति जरंड्यांत । आणि टेंभीस म्हणत आठवा ।। १२ ।। नववा गांवडोंगरांत । तेथें नववा मारुती असत || दहावें स्थान ऊर्णबाहु ह्मणत | चरित्र अदुत तयाचें ।। १३ ।। ही दहा स्थाने ऐशा रीति । परो चांफळ खोन्यांत दोन मति ।। यास्तव हे अकरा मारुती | संप्रदायी जाणती सकळ ।। १ ।। संतविजय अ० १७वा. या मारुतीस उद्देशून च ही स्तोत्रे रचिली असावी असे दिसते. २. वनारी रावणाचें अशोकवन मोडणारा. ३. प्रमंजन वायु ( वायुपुत्र ). ४. हरी-वानर.