पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(११६) श्रीरामदासकृत किष्किंधाकांड. कपीद्रा तुवां शीघ्र पूरीस जावे । चतुर्मास पर्यंत सूखीं क्रमावें ॥ अह्मी या ऋषीपर्वती निश्चयेशी । प्रज्यन्यासि जातां चि यावे त्वरेशी ॥ १६७ ।। रघूनायका सव्य घेऊनि वेगीं । नमस्कार साष्टांग केला प्रसंगी ।। कपीराज गेला निरोपे पुरीसी । रघुराज सौमित्र आरण्यवासी ।। १६८॥ बहू सूख जाले तया सुनिवासी । पुरी आणि तारा दिली आपणासी ।। प्रभू थोर सामर्थ्य याचे कळेना । श्रुती भांडती त्यां कदां आकळेना ।। १६९।। चतुर्मास गेल्या कपी रीस येती । शिळासेतु बांधोनि लंकेस जाती ।। दशग्रीव मारूनि तेतीस कोडी । रघराज हा आदरें देव सोडी ॥ १७० ।। दिनानाथ हा दीन चिंता पहातो । जनीं भाक्तिभावार्थ हा ही पहा तो ।। मनी दृढता भक्ति केली जयाने । खये घेतले जन्म सर्वोत्तमाने ।। १७१ ।। दहा ही बरे वेश सर्वोत्तमाचे । पहील्या प्रसंगींच शंखासुराचे ।। दुजा कूर्मरूपें धरी भारधारी । तिजा ही तसा दाढ देऊनि वारी ।। १७२ ।। चतुर्था मधे भक्त प्रल्हाद पाहे । धरी खूजटू पंचमा माजि देहे ॥ पुढे साहव्या माजि क्षत्री च नाहीं । दिले राज्य विप्रासि सर्वत्र कांहीं ॥ १७३ ।। बळे सप्तमामानि तो देव सोडी । पुढे अष्टमा कंस झाडूनि पाडी ।। प्रसंगी असे बौद्ध मौनावतारी । कलंकी मलेच्छासि होतां चि मारी ।। १७४ ।। दहा सार अव्तार सर्वोत्तमाचे । तयांमाजि दोनी च प्रसिद्ध साचे ।। क्रिडा आठव्यामाजि गोपाळपाळी । रघुराज हा वानरी रीसमेळीं ॥ १७५ ।। असे भिन्न नामें परी भक्त त्याचा । चिरंजीव हा दास विख्यात ज्याचा ।। कळेना मला अल्प ही बुद्धि नाहीं। दयाळा कृपाळा कृपादृष्टि पाहीं ।। १७६ ।। बहूसाल विस्तारली कीर्ति तूझी । कळेना बळे आकळे वाणि माझी ।। परी राहवेना चि मी दीन तुझें । किजे हो क्षमा अल्प अन्याय माझे ॥ १७७॥ किती पीडिले वाळिने सुनिवासी । बहूतां परी राज्य दीले तयासी ।। कृपाळपणे पावला राम तेथे । दीलें राज्य कांता तयाची तयाते ।। १७८ ॥ अशी हे कथा ऐकतां सर्व भावे । तयाला रघनाथ तात्काळ पावे ॥ पुढे ही कदा दुःख होणार नाहीं । सदा छद आनंद ऊदंड देहीं ।। १७९ ॥ बहू पापतापासि हे नाम वारी । हरामानसी गूज ने सौख्यकारी ।। म्हणोनी कथा राघवाची करावी | सदा सर्वदा सृष्टि सूखीं भरावी ।। १८० ॥ सदा सर्वदा येकयेका चि श्लोकीं। अरे ऐकतां होइजे धन्य लोकीं ॥ नसे हो नसे जन्ममाळा तयाला । पुढे संतसंगे चि तो मुक्त जाला ॥ १८१ ।। ॥ इति श्रीरामदासकृत किष्किंधाकांड समाप्त ।। ३३. वेश-अवतार.